शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत जाहिरात फलकांवर कणकवली नगरपंचायत उगारणार कारवाईचा बडगा

By सुधीर राणे | Updated: December 16, 2023 16:49 IST

कणकवली : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कणकवली शहर विद्रुपीकरण होणार नाही याची खबरदारी घेऊन अनधिकृत जाहिरात घोषणाफलकांवर नियमित कारवाई करण्यात ...

कणकवली : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कणकवली शहर विद्रुपीकरण होणार नाही याची खबरदारी घेऊन अनधिकृत जाहिरात घोषणाफलकांवर नियमित कारवाई करण्यात येणार आहे. याबाबत कणकवली नगरपंचायतमार्फत कणकवली शहरातील सर्व नागरिकांना, पक्षप्रमुख, व्यवसायिक यांना जाहिरात घोषणा फलक, होर्डिंग पोस्टर्सच्या परवानगीबाबत अटी व शर्तीनुसार योग्य ती कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सूचित करण्यात आले आहे.याबाबत नगरपंचायतीचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की,शहरात जाहिरात प्रसिध्दीस परवानगी मिळण्यासाठी आवश्यक तो कर व अनामत रकमेचा भरणा आगाऊ करणे आवश्यक आहे. जाहिरातीबाबतची परवानगी ज्या कालावधी पुरती दिली असेल त्या मुदती बाहेर पूर्व परवानगीशिवाय जाहिरात फलक आढळल्यास ती जप्त करण्यात येऊन कारवाई केली जाईल. शासकीय, निमशासकिय सार्वजनिक  ठिकाणच्या जागेत संबंधीत संस्थांच्या पूर्व परवानगी शिवाय जाहिरात प्रसिध्द करता येणार नाही. तसे आढळून आल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता असे फलक जप्त केले जातील. नगरपंचायत हद्दितील फलकासाठी परवानगी घेणे बंधनकारक राहील. फलक लावल्यानंतर वाहतुकीस अथवा रहदारीस अडथळा झाल्यास फलक काढण्यात येतील. धार्मिक अथवा सामाजीक तेढ निर्माण करणारे जाहीरात फलक प्रकाशित करण्यात येणार नाही. जाहिरातीवर प्रिंटरचे नाव, मुदतीचा कालावधी, नगरपरिषद परवाना क्रमांक व दिनांक तसेच कणकवली नगर पंचायत मार्फत पुरविण्यात आलेला क्यूआर कोड यांची स्पष्टपणे नोंद घेणे बंधनकारक राहिल. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गKankavliकणकवली