शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजी महाराजांच्या पुतळा सुशोभीकरणासाठी सहा महिन्यांचे मानधन देणार, नगराध्यक्ष समीर नलावडेंची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2022 17:35 IST

नलावडे यांनी यापूर्वी नगराध्यक्षपदाचे मानधन रोजंदारीवर असणाऱ्या मजुरांना कोविड काळात कमळ थाळी देण्याकरीता व शहीद जवानांच्या कुटुंबियांना दिली होती.

कणकवली : कणकवली  शहराचा प्रथम नागरिक म्हणून सर्व्हिस रोड वर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या स्थलांतरण व सुशोभीकरणासाठी सहा महिन्याचे नगराध्यक्षपदाचे मानधन आपण देणार आहोत. सुमारे ९० हजार रुपयांची रक्कम छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्र मंडळ यांच्याकडे सुपूर्द करण्यात येईल. अशी घोषणा कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी मंगळवारी केली. 

कणकवली नगरपंचायत कार्यालयात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, नगरसेवक अभिजीत मुसळे, ऍड. विराज भोसले, महेश सावंत आदी उपस्थित होते. 

ते म्हणाले, यापूर्वी नगराध्यक्षपदाचे मानधन रोजंदारीवर असणाऱ्या मजुरांना कोविड काळात कमळ थाळी देण्याकरीता व  शहीद जवानांच्या कुटुंबियांना दिली होती. त्याचप्रमाणे पुढील सहा महिन्याचे मानधन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या स्थलांतरणाकरिता देण्यात येणार आहे. ही रक्कम तेथील मंडळाने शिवरायांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी वापरावी. 

संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर देशाचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे योग्य जागी स्थलांतरण व्हावे अशी आमची इच्छा आहे. यापूर्वी कणकवली नगरपंचायतकडून पुतळा स्थलांतरणाकरिता पाचशे चौरस फुटाच्या जागेचा प्रस्ताव व त्या अनुषंगाने अन्य बाबी जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केल्या आहेत. आता जिल्हाधिकारी पुतळा स्थलांतरणाबाबत निर्णय घेतील. पालकमंत्री उदय सामंत व आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून पुतळा स्थलांतरणासंदर्भात पाठपुरावा सुरू आहे. हे काम अंतिम टप्प्यात आलेले असताना पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार तेथील १८ गुंठे जागेची मोजणी देखील करून घेण्यात आली आहे. त्यामुळे कणकवली शहरातील या महत्वपूर्ण कामाकरिता माझा हातभार लागावा म्हणून सहा महिन्यांच्या मानधनाची रक्कम देण्याचा  निर्णय घेतल्याचे नलावडे यांनी सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग