शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
3
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
4
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
5
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
6
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
7
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
8
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
9
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
10
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
11
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
12
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
13
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
14
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
15
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
16
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
17
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
18
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
19
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर
20
पुढील माहिती मिळेपर्यंत नेपाळला जाऊ नका; सरकारने भारतीयांसाठी सूचना दिल्या

काळभैरव मंदिराची फंडपेटी फोडली, खारेपाटण येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 11:27 IST

७२ खेड्यांचे आराध्य देवस्थान असलेल्या खारेपाटण येथील काळभैरव मंदिराची फंडपेटी चोरट्यांनी शनिवारी रात्री १ वाजण्याच्या सुमारास फोडून जवळपास ५० हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम लंपास केली. खारेपाटणसह दशक्रोशीतील या प्रसिद्ध देवस्थानात हा प्रकार घडल्याने खारेपाटण शहरात एकच खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देकाळभैरव मंदिराची फंडपेटी फोडली, खारेपाटण येथील घटना पन्नास हजारांपेक्षा जास्त रक्कम चोरट्यांनी केली लंपास

खारेपाटण : ७२ खेड्यांचे आराध्य देवस्थान असलेल्या खारेपाटण येथील काळभैरव मंदिराची फंडपेटी चोरट्यांनी शनिवारी रात्री १ वाजण्याच्या सुमारास फोडून जवळपास ५० हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम लंपास केली. खारेपाटणसह दशक्रोशीतील या प्रसिद्ध देवस्थानात हा प्रकार घडल्याने खारेपाटण शहरात एकच खळबळ उडाली आहे.याबाबत अधिक वृत्त असे की, शनिवार १ जून रोजी रात्री देवस्थान कमिटी अध्यक्ष व कर्मचारी मंदिर नेहमीप्रमाणे बंद करून गेले. त्यानंतर रात्री १२.४५ च्या सुमारास एका चोरट्याने मंदिराच्या मुख्य दरवाजातून प्रवेश केला. त्यानंतर या चोरट्याने मंदिराच्या मागील बाजूचा दरवाजा उघडून आपल्या अन्य दोन साथीदारांना मंदिरात प्रवेश करण्यास दिला.

चोरीच्या तपासासाठी श्वानपथक मागविण्यात आले होते.

मंदिरात प्रवेश केल्यानंतर सभागृहातील लाईट बंद करून या चोरट्यांनी बॅटरीच्या सहाय्याने फंडपेटीचे निरीक्षण केले. परंतु मंदिरातील दानपेटी जवळपास ६० ते ७० किलो वजनाची असल्याने चोरट्यांना उचलणे कठीण जात होते. २० मिनिटांच्या अथक परिश्रमानंतर या तीन चोरट्यांनी फंडपेटी उचलून मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या शेतमळ्यात नेऊन दगडाच्या सहाय्याने फोडून आतील सर्व रक्कम घेऊन ते ेपसार झाले. हे चोरीचे नाट्य जवळपास अर्धा तास चालू होते.रविवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास गावातील काही लोक नदीवर आंघोळीसाठी जात असताना त्यांना फंडपेटी फोडलेल्या अवस्थेत दिसली. त्यांनी मंदिर देखभालीसाठी असणारे तावडे यांना कल्पना दिली. तसेच तत्काळ काळभैरव, दुर्गादेवी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष मधुकर गुरव यांना कळविण्यात आले.

ही बातमी समजताच मंगेश गुरव, गोट्या कोळसुलकर, योगेश गोडवे, अण्णा तेली, बबन तेली व अन्य ग्रामस्थांनी मंदिरामध्ये येऊन मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज पाहिले. त्यावेळी रात्री १२.४५ ते १.२० पर्यंत हे चोरीचे नाट्य घडल्याचे त्यात दिसून आले. या कॅमेºयामध्ये दोन चोरांचे चेहरे बºयापैकी दिसून आले असून संपूर्ण चोरी या कॅमेºयात कैद झाली आहे.दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास कणकवली पोलीस उपनिरीक्षक पी. एन. कदम तसेच व्ही. एम. चव्हाण, कॉन्स्टेबल कोळी व कॉन्स्टेबल पाटील घटनास्थळी हजर झाले व संबंधित जागेचा पंचनामा केला. दुपारी ३.३० वाजता ओरोस येथून श्वानपथक मागविण्यात आले. या घटनेचा पुढील तपास सुरु असून सीसीटीव्ही कॅमेºयातील फुटेजमुळे चोर सापडू शकतील असा प्राथमिक अंदाज आहे.तपास त्वरित करून चोरट्यांना जेरबंद करावे अशी विनंती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष मधुकर गुरव यांनी पोलीस प्रशासनाला केली आहे. मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये परप्रांतीय लोकांनी झोपड्या बांधून वस्ती केली आहे. हे परप्रांतीय कर्नाटक, महाराष्ट्रातील  मराठवाडा, विदर्भ येथून गावात वेगवेगळे व्यवसाय करून शेतमळ्यांमध्ये झोपड्या बांधून राहिले आहेत. या घटनेनंतर त्या लोकांची त्वरित तपासणी करून गाव सोडून जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत.चोरांची टोळी संबंधित जागेशी परिचितमंदिरामध्ये चोरी करण्यासाठी आलेले तीनही चोर संबंधित जागेशी परिचित असल्याचा अंदाज आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील हालचालींवरून संबंधित चोर संपूर्ण माहितगार असून या कॅमेऱ्यातील फुटेजमध्ये गावातील एक व्यक्ती मंदिराच्या सभागृहाच्या टेबलवर झोपलेली आढळली आहे.

घटनेच्या आधी दहा मिनिटे ही व्यक्ती सभागृहात येऊन झोपली असून घटना घडून गेल्यानंतर दहा मिनिटांनी उठून गेली. त्यामुळे या चोरीच्या घटनेशी या संबंधित व्यक्तीचा थेट संबंध असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे ही दानपेटी उघडून त्यातील रक्कम बॅँकेत भरण्याची चर्चा मंदिरात झाली होती. ही चर्चा होत असतानासुद्धा ती या चोरट्यांच्या कानावर पडली असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

 

 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsindhudurgसिंधुदुर्ग