शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टर, वकिलांप्रमाणेच शिक्षकांच्या समोर 'टीआर'चा लोगो - आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे 

By अनंत खं.जाधव | Updated: April 21, 2023 19:04 IST

शिक्षण विभागात काही एजंट बसले आहेत. त्यांना वटणीवर आणले जाईल

सावंतवाडी : जसे डॉक्टर, वकील, इंजिनियर आदींच्या नावाच्या बोर्डासमोर त्यांच्या पदव्या आहेत तसे आता शिक्षकांच्या नावासमोर टी. आर ही पदवी लावली जाणार आहे. तशी घोषणा लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार असल्याची माहिती शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी दिली. वाढीव अनुदान टप्पा वाटपाबाबत पटसंख्येची अट कमी करण्यात येणार आहे तसा निर्णयही झाला आहे असेही त्यांनी  यावेळी  स्पष्ट केले.आमदार झाल्यानंतर प्रथमच ज्ञानेश्वर म्हात्रे हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा करत असून शुक्रवारी त्यानी सावंतवाडी येथे भेट देऊन शिक्षकांच्या समस्या जाणून घेतल्या.यावेळी मुख्याध्यापक संघाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा राज्याचे सहकार्यवाह रामचंद्र घावरे, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष गुरुदास कुसगावकर, भरत सराफदार, रमेश जाधव, चंद्रकांत पवार ,लक्ष्मण गवस, सुमेधा नाईक, म्हापसेकर अर्चना सावंत,परब घावरे, आदि उपस्थित होते.म्हात्रे म्हणाले, शिक्षण विभागात काही एजंट बसले आहेत. ते शिक्षकांकडून विविध कामे करून घेण्यासाठी पैसे मागत आहेत. जर शिक्षकांची अशी पिळवणूक होत असेल तर त्यांना वटणीवर आणले जाईल असेही त्यांनी सुचित केले. सावंतवाडी- दोडामार्ग या दोन तालुक्यात त्यांनी शिक्षकांच्या समस्या अडचणी संदर्भात बैठका घेतल्या.यापुढे ही अशा बैठका घेऊन त्या समस्या लवकरच वरिष्ठ पातळीवर सोडवू.आपण आपल्या आमदार निधीतून यापुढे प्रत्येक शाळेत ई लर्निंग टीव्ही संच चांगल्या दर्जाचे देणार आहोत. तसेच यापुढे गावागावात इंग्रजी माध्यमांकडे ओढा दिसत आहे.व मराठी शाळांकडे जाण्याची संख्या कमी आहे पण यासाठी मराठी माध्यमांचे इंग्रजी पुस्तकात बदल केला जाणार आहे.असेही म्हात्रे म्हणाले.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षण विभागातील थकीत 400 बिलांचे अनुदान आपण पुणे येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयातून उपलब्ध करून आणून दिल्याचे सांगत यापुढे आता निवड श्रेणी पध्दत असणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गTeacherशिक्षक