शहरं
Join us  
Trending Stories
1
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
2
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
3
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
4
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
5
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
6
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
7
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर
8
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
9
IND vs WI: टेस्टच्या नव्या पर्वात 'ओल्ड इज गोल्ड फॉर्म्युला'! जड्डू टीम इंडियाचा 'पार्ट टाइम डेप्युटी'
10
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
11
खऱ्या आयुष्यातला राया..! सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांबद्दल विचारताच लाजली पूजा बिरारी
12
शेअरचा धमाका...! या ₹3.90 च्या स्टॉकनं दिला छप्परफाड परतावा, ₹1 लाखाचे केले ₹2.09 कोटी; तुमच्याकडे आहे का?
13
ठरलं!! अश्विन भारताबाहेर पाकिस्तानी खेळाडूसोबत एकाच संघात, 'या' नंबरची जर्सी घालणार!
14
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
15
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
16
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
17
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
18
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
19
२० दिवस अत्यंत धोक्याचे! मंगल-हर्षल षडाष्टक योग; घात-अपघातापासून कसे वाचावे?
20
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल

सत्तेचा सारीपाट: आरोप-प्रत्यारोपातून निव्वळ मनोरंजन!

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: April 25, 2024 11:46 IST

प्रत्यक्षात ते खरे, खोटे आहेत, याची शहानिशा नंतर कोण करत बसत नाहीत

-महेश सरनाईक, सिंधुदुर्गलोकसभा निवडणुकीचे वारे आता जोरात वाहू लागले आहेत. एकीकडे उष्णतेची लाट आहे. तापमानाचा पारा चाळीशीकडे झेपावतोय आणि दुसरीकडे लोकशाहीचा उत्सव साजरा होतोय. पुढील पाच वर्षांसाठी मतदार राजाने भरभरून मतदान करून आपला प्रतिनिधी निवडायचा आहे. त्यासाठी राजकीय नेतेमंडळी जी निवडणुकीनंतर पुढील पाच वर्षांपर्यंत सुशेगाद (आरामात) राहणार आणि पुन्हा निवडणुका आल्या की जागे होणार. अशी सुरू असलेली परंपरा मोडीत काढण्यासाठी मतदारांनी चाणाक्षपणे मतदान करणे आवश्यक आहे. परंतु, तसे होताना दिसत नाही. राजकीय नेतेमंडळी वेगवेगळी आमिषे, आश्वासने आणि भूलथापा देऊन आपल्यालाच मतदान करण्यासाठी भाग पाडतात. लोकशाही प्रणालीत प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. त्या स्वातंत्र्याप्रमाणे मतदान झाल्यास मतदानाची टक्केवारी वाढेल आणि चांगले, सुसंस्कृत उमेदवार लोकप्रतिनिधी म्हणून निवडले जातील.निवडणूक जवळ आली की, उमेदवारांकडून एकमेकांवर आरोप - प्रत्यारोप होताना आढळतात. प्रत्यक्षात ते खरे, खोटे आहेत, याची शहानिशा नंतर कोण करत बसत नाहीत. परंतु, आपणच कसा चांगला आहे आणि माझा प्रतिस्पर्धी कसा कलंकित आहे, हे दाखविण्याची जणू स्पर्धाच लागते. त्यातून मग उठसूठ आरोपांच्या फैरी झडताना आढळतात. राजकारण करताना उमेदवारांनी आपल्याला हे सोसावेच लागेल म्हणून जणू काही शपथ घेतलेली असते. त्यामुळे एखादा आरोप झाला तरी कोणच धुतल्या तांदळासारखा नसतो असे म्हणत ते आरोप परतावून लावताना प्रतिस्पर्ध्यावर प्रत्यारोप केले जातात.

आताची लोकसभा निवडणूक तर फारच वेगळी आहे. गतवेळी एकत्र प्रचार करणारे यावेळी एकमेकांचे विरोधक आहेत. त्यामुळे आपल्यासमवेत असलेल्या मित्रांची राजकीय कुंडलीच त्यांना पाठ आहे. त्यातून आरोपांच्या फैरी झडत आहेत. मतदारांना मात्र, हे आरोप - प्रत्यारोप नवे नाहीत. त्यांना राजकारण्यांची कुवत आणि काम करण्याची पद्धत माहीत आहे. त्यामुळे कोणी किती आरोप केले तरी मतदारराजाने २०२४ मध्ये कोणाच्या पारड्यात मत टाकायचे याचा फैसला आधीच केला आहे. त्यामुळे आता सत्ताधारी किवा विरोधक उमेदवार एकमेकांवर करत असलेल्या आरोपांकडे केवळ मनोरंजन म्हणून पाहिले जात आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गratnagiri-sindhudurg-pcरत्नागिरी-सिंधुदुर्गlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४