शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

ज्युडोमध्ये दोन कास्यंपदके

By admin | Updated: December 2, 2014 00:23 IST

राज्यभरातून प्रत्येक जिल्ह्यातील प्रथम क्रमांक प्राप्त ४५० पेक्षा अधिक खेळाडू सहभागी झाले होते.

तळेरे : महाराष्ट्र ज्युडो असोसिएशन व नंदूरबार ज्युडो असोसिएशनच्यावतीने आयोजित ४२ व्या युथ आणि ज्युनिअर्स राज्य चॅम्पियनशीप २०१४ व राष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्याला दोन कांस्यपदके मिळाली आहेत. ही स्पर्धा नंदूरबार येथे झाली. या स्पर्धेला राज्यभरातून प्रत्येक जिल्ह्यातील प्रथम क्रमांक प्राप्त ४५० पेक्षा अधिक खेळाडू सहभागी झाले होते. १२ ते १७ वयोगटात कासार्डे ज्युनिअर कॉलेजची खेळाडू प्राची खांडेकर हिने ४८ किलो वजनी गटात मुंबई व कोल्हापूरच्या खेळाडूंवर मात करीत कांस्य पदक पटकावले. कासार्डे माध्यमिक विद्यालयाच्या प्रणय काडगे याने ४० किलो वजनी गटात कांस्य पदकाची कमाई केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एकूण ७ खेळाडूंनी या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग दर्शवला होता. यामध्ये कल्पेश तळेकर, सिद्धेश राणे, अनिल जाधव, अमोल तेजम, साहिल कुबडे यांनी खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करीत उपउपांत्य फेरीपर्यंत मजल मारली. विजेत्या खेळाडूंना महाराष्ट्र ज्युडो असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय भोसले, सचिव दत्ता आफणे, शैलेश टिळक यांच्या हस्ते पदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.या यशस्वी खेळाडूंना ज्युडो प्रशिक्षक दत्तात्रय मारकड, अभिजीत शेटये, राकेश मुणगेकर, निळकंठ शेटये, सिद्धेश माईणकर, रूपेश कानसे आदींचे मार्गदर्शन लाभले. सिंधुदुर्ग जिल्हा ज्युडो असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. मिलिंद कुलकर्णी, कासार्डे शिक्षण संस्थेचे संस्था पदाधिकारी प्रभाकर कुडतरकर, मधुकर खाडये, प्राचार्य पी. एस. पाटील, उपमुख्याध्यापक ए. बी. शेख, पर्यवेक्षक ए. ए. मुदाळे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले. (वार्ताहर)