शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

पत्रकार अनंत जाधव यांच्यासह सिंधू रक्तमित्रला पत्रकार प्रेरणा पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2022 17:55 IST

Sindhudurg: भारतीय पत्रकारांची राष्ट्रीय संघटना असलेल्या ऑल जर्नलिस्ट फ्रेंड सर्कलच्या पत्रकार प्रेरणा पुरस्काराची घोषणा शुक्रवारी करण्यात आली असून यात महाराष्ट्रातून बारा पत्रकार व छायाचित्रकार यांची घोषणा करण्यात आली

सावंतवाडी : भारतीय पत्रकारांची राष्ट्रीय संघटना असलेल्या ऑल जर्नलिस्ट फ्रेंड सर्कलच्या पत्रकार प्रेरणा पुरस्काराची घोषणा शुक्रवारी करण्यात आली असून यात महाराष्ट्रातून बारा पत्रकार व छायाचित्रकार यांची घोषणा करण्यात आली असून यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातून पत्रकार अनंत जाधव यांच्या नावाचा समावेश आहे. तसेच रक्तदान क्षेत्रात लक्षणीय कार्य करणाऱ्या सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानला हि प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. कोल्हापूर येथील पत्रकार अधिवेशन कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार जतिन देसाई यांच्या उपस्थितीत येत्या दि. २७ डिसेंबर रोजी वितरित केला जाणार आहे.

भारतीय पत्रकारांची राष्ट्रीय संघटना म्हणून ऑल जर्नलिस्ट फ्रेड सर्कल गेले अनेक वर्षे काम करत असून पत्रकारांच्या विविध समस्यांबाबत ते आवाज उठवत असतात महाराष्ट्रातील अनेक पत्रकाराच्या समस्या मंत्रालयीन पातळीवर सोडवल्या असून या संघटनेचे दरवर्षी अधिवेशन होते.त्यात पत्रकार आपल्या समस्या मांडत असतात.

यावर्षी चे अधिवेशन २७ डिसेंबर ला कोल्हापूर येथे होत आहे. या अधिवेशनात ऑल जर्नलिस्ट फ्रेड सर्कलच्या पत्रकार प्रेरणा पुरस्कार प्राप्त पत्रकारा बरोबर राज्यातील दोन सामाजिक संस्थाना गौरविण्यात येणार आहे यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचा समावेश आहे.तसेच पत्रकार प्रेरणा पुरस्कार प्राप्त अनंत जाधव यांना ही गौरविण्यात येणार आहे.अनंत जाधव हे गेली वीस वर्षे विविध दैनिकातून आपली पत्रकारिता करीत असून, त्यांनी विविध विषयांवर लेखन केले असून त्याचा कोल्हापूर येथील अधिवेशनात ज्येष्ठ पत्रकार जतिन देसाई यांच्या उपस्थितीत गौरविण्यात येणार आहे.

या कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार सचिन परब, माहिती उपसंचालक संभाजी खराट, ऑल जर्नालिस्ट फ्रेंड सर्कल चे संस्थापक अध्यक्ष यासिन पटेल तसेच केंद्रिय अध्यक्ष गणेश कोळी,कांचन जाबोटी,राजेश पाटील आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गJournalistपत्रकार