शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
3
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
4
सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
5
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
6
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
7
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
8
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
9
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
10
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
11
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
12
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
13
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
14
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
15
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
16
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
17
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
18
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
19
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
20
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार

जलयुक्त शिवार अभियान..

By admin | Updated: September 20, 2015 23:42 IST

जिल्ह्यात केवळ ६ महिन्यात ५१५ कामे पूर्ण

राज्यातील सततच्या टंचाईसदृश्य परिस्थितीवर मात करण्यासाठी पाणी टंचाईमुक्त महाराष्ट्र २०१९ अंतर्गत जलयुक्त शिवार अभियान हाती घेण्यात आले आहे. शासनाचे हे अभियान टंचाईमुक्त महाराष्ट्राच्या दिशेने पडलेलं एक महत्वाचं आणि आश्वासक पाऊल आहे. राज्यभरात प्रशासनाने अभियानावर आपलं संपूर्ण लक्ष केंद्रीत केलं आहे. आजमितीस राज्याच्या ६ हजार गावांमध्ये एकूण ७० हजार जलसंधारणाची कामे जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सुरू आहेत. अभियानाच्या अंमलबजावणीत रत्नागिरी जिल्हाही आघाडीवर असून, पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात अभियानाची अंमलबजावणी सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यात प्रचंड प्रमाणात पडणाऱ्या पावसाचे बहुतांश पाणी वाहून जाते. जलयुक्त शिवार अभियानामुळे हे पाणी गावात अडवले जाणार आहे. त्यामुळे काही अंशी पाणी प्रश्न सुटू शकणार आहे. त्याचबरोबर जमिनीत पाणी जिरल्यामुळे जिल्ह्याची सिंंचन क्षमता वाढून भात, फळपिके, कडधान्य यांच्या लागवडीखालील क्षेत्रात वाढ होऊ शकेल. यामुळेच भौगोलिक स्थिती व पीक पद्धती यांचा विचार करुन अभियानाची आखणी करण्यात आली. जिल्ह्यातील अभियानांतर्गत निवडलेल्या ४७ गावांचे सविस्तर आराखडे तयार करण्यात आले आहेत.जिल्ह्यात या अभियानाअंतर्गत एकूण ३२५८.६८ लाख इतक्या निधीपैकी १२९७.७४ लाख इतका अंमलबजावणी यंत्रणांना निधी प्राप्त झालेला आहे. यात डी. पी. डी. सी.मधून ४३७.२५ लाख, राज्य योजनेतून १४.१२ लाख, जलयुक्त शिवार अभियानातून २७८.११ लाख, एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रमातून २४८.७१ लाख, महात्मा फुले जलभूमि अभियानातून १०३.८२ लाख, कोडवाहू अभियानामधून १५.७३ लाख आणि विविध संस्थांच्या सामाजिक दायित्व निधीतून २०० लाख रुपये इतका निधी प्राप्त झालेला आहे. जिल्ह्यात केवळ ६ महिन्यात ५१५ कामे पूर्णजिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत ९ तालुक्यात कृषी विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग आणि लघुसिंंचन विभागाकडून एकूण १०९७ कामे घेण्यात आली आहेत. पैकी ५१५ कामे पूर्ण झाली आहेत. जलयुक्त शिवार अभियानात एकूण ४७ गावांपैकी रत्नागिरी तालुक्यातील ५ गावांमध्ये एकूण ६० कामांपैकी ३२ कामे पूर्ण झाली असून, २८ कामे सुरू आहेत. लांजा तालुक्यातील ५ गावांमध्ये एकूण ७८ कामांपैकी २५ पूर्ण आणि ५३ प्रगतीपथावर, राजापूर तालुक्यातील ५ गावांमध्ये १४५ कामांपैकी ४९ कामे पूर्ण आणि ९६ कामे प्रगतीपथावर, चिपळूण तालुक्यातील ५ गावांमध्ये ७७ कामांपैकी ६७ कामे पूर्ण व १० कामे प्रगतीपथावर, गुहागरमधील ५ गावांमध्ये १२४ कामांपैकी ९९ कामे पूर्ण आणि २५ कामे प्रगतीपथावर, संगमेश्वर तालुक्यातील ५ गावांमध्ये ७१ कामांपैकी ६३ कामे पूर्ण व ८ कामे प्रगतीपथावर, खेड तालुक्यातील ७ गावांमध्ये २४१ कामांपैकी ६८ कामे पूर्ण व १७३ कामे प्रगतीपथावर, दापोली तालुक्यातील ५ गावांमध्ये १२० कामांपैकी ५८ पूर्ण व ६२ प्रगतीपथावर आणि मंडणगड तालुक्यातील ५ गावांमध्ये ४४ कामांपैकी २८ कामे पूर्ण झाली असून, १६ कामे सुरू आहेत. तसेच ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या ८७ कामांपैकी ५८ कामे पूर्ण झाली आहेत तर लघु सिंंचन विभागाची दोन कामे प्रगतीपथावर आहेत. नरेगामधून एकूण ४८ कामांपैकी ३८ कामे पूर्ण व १० कामे प्रगतीपथावर आहेत.-विजय कोळीजिल्हा माहिती अधिकारी