शहरं
Join us  
Trending Stories
1
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
2
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
3
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
4
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
5
फक्त गरबाच खेळा...हुल्लडबाजी नको; दांडियामध्ये साध्या वेशात महिला पोलीस सहभागी होणार
6
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
7
Viral News: कानपूरहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात उंदीर; उड्डाणाला साडेतीन तास विलंब!
8
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
9
अमूलनं बटर, तूप, चीज, आईस्क्रीम आणि चॉकलेटच्या किमती केल्या कमी; प्रत्येक वस्तूवर किती बचत होणार? जाणून घ्या
10
बगराम तळावरून सुरु झाला नवा संघर्ष? डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीवर तालिबानचे प्रत्युत्तर
11
शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex ४७५ अंकानी आपटला; Nifty मध्येही घसरण, IT शेअर्समध्ये जोरदार विक्री
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर नवदुर्गा कृपा, पद-पैसा-लाभ; अकल्पनीय यश, अनपेक्षित भरभराट!
13
"आता जे गरजेचं ते करावंच लागेल"; सरसंघचालक भागवत अमेरिकेच्या टॅरिफ आणि 'एच१ बी'बद्दल स्पष्टच बोलले 
14
Mumbai: गावी जाण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्यानं पत्नीची हत्या; कांदिवली येथील घटना!
15
देवोलिना भट्टाचार्जी पुन्हा प्रेग्नंट? फोटोशूटवरुन चर्चांना उधाण; ९ महिन्यांपूर्वीच दिला मुलाला जन्म
16
नौशादनं 'आकाश' बनून फसवलं, एका मुलाच्या आईसोबत लग्न केलं अन् ४ मित्रांसोबत मिळून...; घटना ऐकून येईल चीड!
17
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
18
पाकिस्तानच्या नाकी नऊ आणणाऱ्या अभिषेक शर्माचा नावावर विश्वविक्रमाची नोंद, युवराजलाही टाकले मागे
19
GST कपातीनंतर आता कोणत्या वस्तूंवर सर्वाधिक टॅक्स?; यादी वाचा, अन्यथा खिशाला बसेल झळ
20
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते 'मिशन शक्ती ५.०'चा शुभारंभ; महिला सुरक्षेवर भर, पोलिसांत महिलांचा सहभाग वाढला!

महामार्ग दूरवस्थेबाबत कुडाळ येथे जेलभरो आंदोलन, सर्व विरोधी पक्ष एकवटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 11:50 IST

कुडाळ : मुंबई-गोवा महामार्गाची चौपदरीकरण कामाअतंर्गत झालेली दूरवस्था, सत्ताधाऱ्यांच्या कामगिरीचा निषेध करीत सर्व विरोधी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी मंगळवारी ...

ठळक मुद्दे महामार्ग दूरवस्थेबाबत कुडाळ येथे जेलभरो आंदोलन, सर्व विरोधी पक्ष एकवटले बांधकाममंत्र्यांना अडवण्याचा आंदोलनकर्त्यांचा इशारा, २६४ आंदोलनकर्त्यांवर कारवाई

कुडाळ : मुंबई-गोवा महामार्गाची चौपदरीकरण कामाअतंर्गत झालेली दूरवस्था, सत्ताधाऱ्यांच्या कामगिरीचा निषेध करीत सर्व विरोधी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी मंगळवारी कुडाळ येथे जेलभरो आंदोलन छेडले. यापुढेही जनतेच्या प्रश्नांसाठी सर्व विरोधक एकत्र येऊन लढा देतील. तसेच ३१ जुलै रोजी जिल्हा दौऱ्यांवर येणारे बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांना महामार्गावर अडविण्यात येईल, असा इशारा आंदोलकनकर्त्यांनी दिला. यावेळी सुमारे २६४ आंदोलनकर्त्यांवर कुडाळ पोलीस ठाण्यात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.चौपदरीकरणाच्या कामात महामार्गाची झालेली दुरवस्था, शासनाकडून कणकवली येथील आंदोलन दडपण्याचा झालेला प्रयत्न व आंदोलनकर्त्यांवर केलेल्या कारवाईच्या विरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे व महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्यावतीने हे जेलभरो आंदोलन छेडण्यात आले.या आंदोलनात मनसेचे सरचिटणीस व माजी आमदार परशुराम उपरकर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष विकास सावंत, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश गवस, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई, मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब, राजन दाभोलकर, सावंतवाडी नगराध्यक्ष बबन साळगावकर, कुडाळ नगराध्यक्ष ओंकार तेली, काँग्रेस प्रवक्ते काका कुडाळकर, राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रिक, राष्ट्रवादी प्रांतिक सदस्य अमित सामंत तसेच जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी उपरकर म्हणाले, पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मंत्रीपदाचा वापर हौस भागविण्यासाठी केला. मात्र, जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांना वेळ नाही. केसरकर यांनी आता साडेचार वर्षातील विकास सांगावा. अन्यथा आम्ही येत्या दोन महिन्यात त्यांनी व सरकारने काय केले व काय केले नाही याची पोलखोल करू. बबन साळगावकर यांनी केसरकर यांच्यावर टीका केली.सत्ताधाऱ्यांना सोयरसुतक नाहीविकास सावंत म्हणाले, आम्ही आमच्या काळात कोणतेच आंदोलन चिघळू दिले नाही. मात्र, आमच्या काँग्रेस पक्षात त्यावेळी असलेले केसरकर व नाईक हे त्याला अपवाद आहेत. कारण ते काँग्रेमध्ये घडून सुध्दा एखाद्या मूर्तीत राहिलेल्या बुडबुड्याप्रमाणे होते. त्या दोघांनाही जनतेच्या समस्या कधीच समजल्या नाहीत. आताही जनतेच्या प्रश्नांबाबत त्यांना कोणतेही सोयरसुतक नाही.कुडाळ शहर घोषणांनी दुमदुमलेया आंदोलनादरम्यान विरोधकांनी गली गली में शोर है, पालकमंत्री चोर है आदी घोषणा सत्ताधाऱ्याच्या निषेधार्थ केलेल्या घोषणांनी कुडाळ परिसर दुमदुमून गेला होता. तसेच उद्दाम बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांचा निषेध अशी बॅनरबाजीही करण्यात आली होती. 

टॅग्स :highwayमहामार्गsindhudurgसिंधुदुर्ग