शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

'जाधवांची ओळख वाळू, लाकूडचोर'; सावंतवाडीत भाजप पदाधिकारी आक्रमक

By अनंत खं.जाधव | Updated: October 19, 2022 15:14 IST

सावंतवाडीत भाजप पदाधिकारी आक्रमक: जशास तसे उत्तर देण्याचा इशारा

सावंतवाडी : वाळू आणि लाकुड चोर म्हणून ओळख असलेल्या भास्कर जाधव यांनी आमचे नेते नारायण राणेंच्या विरोधात तोंड सांभाळून बोलावे, अन्यथा तुमचे सिंधुदूर्गात आमच्या पध्दतीने स्वागत करू, असा इशारा भाजपाचे प्रवक्ते तथा माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी दिला. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. सिंधुदूर्गात दहशतवाद नव्हताच हे आमच्या सोबत आल्यानंतर मंत्री दिपक केसरकर यांना सुद्धा कळले असा टोला ही परब यांनी लगावला कुडाळ येथे झालेल्या सभेत  राणे यांच्यावर शेलक्या भाषेत टिका करणार्‍या शिवसेना नेते भास्कर जाधव यांचा परब यांनी समाचार घेतला.

यावेळी शहर अध्यक्ष अजय गोंदावळे, माजी नगरसेवक आनंद नेवगी, दिलीप भालेकर, बंटी पुरोहीत, अजय सावंत, अमित परब उपस्थित होते.परब म्हणाले,भास्कर जाधव यांची वाळू आणि लाकुड चोर म्हणून ओळख आहे. त्या ठीकाणी असलेले लोक त्यांना शिवीगाळ करतात ही वस्तूस्थिती आहे, अशा परिस्थिती ज्यांची आपल्या मतदार संघात पात्रता नाही, त्यांनी आमच्या नेत्यावर टिका करणे योग्य नाही. असाच प्रकार त्यांच्याकडुन सुरू राहील्यास आम्ही आमच्या पध्दतीने त्यांचे जिल्ह्यात स्वागत करू, जाधव हे स्वतः गद्दार आहेत. त्यांनी यापुर्वी शिवसेना सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरे व उध्दव ठाकरे यांच्यावर टोकाची टिका केली होती. त्यामुळे त्यांनी आता निष्ठेच्या गोष्टी सांगू नयेत. राणेंवर बोलण्याची त्यांची पात्रता नाही. कात विकून युवा पिढी बरबाद करणार्‍यांना आम्ही धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही.असा इशारा ही परब यांनी दिला आहे. सिंधुदूर्गात मूळात दहशतवाद नव्हता. त्यावेळी मंत्री दिपक केसरकर हे आपल्या राजकीय फायद्यासाठी तशा प्रकारची टिका करीत होते. मात्र आज त्यांची आमच्या सोबत युती झाल्यानंतर जिल्ह्यातील दहशतवाद नसल्याचे त्यांनीही मान्य केले असावे असा टोला ही यावेळी परब यांनी लगावला.

टॅग्स :SawantwadiसावंतवाडीMumbaiमुंबईBhaskar Jadhavभास्कर जाधवBJPभाजपा