शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

बंदर निरीक्षकांना विचारला जाब, मनसे पदाधिकाऱ्यांची धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 15:41 IST

मालवण : गेले काही महिने मालवण बंदरात मोडून पडलेल्या हवामान विषयक माहिती देणाऱ्या बावटाकाठीच्या दुरुस्तीकडे बंदर विभागाने दुर्लक्ष केले आहे. ...

ठळक मुद्देबंदर निरीक्षकांना विचारला जाब, मनसे पदाधिकाऱ्यांची धडक हवामान विषयक माहिती देणारी बावटाकाठी नादुरुस्त

मालवण : गेले काही महिने मालवण बंदरात मोडून पडलेल्या हवामान विषयक माहिती देणाऱ्या बावटाकाठीच्या दुरुस्तीकडे बंदर विभागाने दुर्लक्ष केले आहे. याबाबत माहिती समजताच संतप्त बनलेल्या मनसेच्या पदाधिकाºयांनी मनसे जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर यांच्या नेतृत्वाखाली मालवण बंदर विभागाचे निरीक्षक अमोल ताम्हणकर यांना जाब विचारत धारेवर धरले.दरम्यान, याबाबत राजन दाभोलकर यांनी सागरी अभियंता व मेरीटाईम बोर्ड मुंबईचे मुख्य सर्व्हेअर प्रकाश चव्हाण यांच्याशी फोनवर चर्चा करीत लक्ष वेधले असता मोडलेली बावटाकाठी आणि बोयांवरील लाईट हे  दोन्ही प्रश्न चार  दिवसांच्या आत सोडविण्याचे आश्वासन त्यांनी दिले.मालवण बंदरातील कलंडलेली बावटाकाठी व लाईट न पेटणारे नौकायन बोया या आणि बंदरातील विविध समस्या गेले अनेक महिने सोडविल्या न गेल्याबाबत मनसेचे जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर यांनी मालवण बंदर कार्यालयात बंदर निरीक्षकांना जाब विचारला.यावेळी त्यांच्यासमवेत मनसे  तालुकाध्यक्ष विनोद सांडव, मनविसे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर, शैलेश अंधारी, विल्सन गिरकर, विनायक गावडे, गुरू तोडणकर, भारती वाघ, विशाल ओटवणेकर आदी उपस्थित होते.यावेळी राजन दाभोलकर यांनी मालवण बंदरात मच्छिमारांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबत मालवण बंदर निरीक्षक अमोल ताम्हणकर यांच्याबरोबर विस्तृत चर्चा केली. मालवण बंदर क्षेत्रातील समुद्रात मच्छिमारांना दिशादर्शक ठरणारे ५ नौकायन बोया स्थापित केले होते. मात्र, सध्या एकाही बोया वरील लाईट सुरू नसल्याचे राजन दाभोलकर यांनी निदर्शनास आणुन दिले.तसेच मच्छिमारांना हवामान विषयक माहिती देणारी आणि वादळी स्थितीच्या धोक्याची माहिती देणारी मालवण बंदरातील मेढा राजकोट येथील  बावटाकाठीही सद्यस्थितीत एका बाजूला कलंडली गेली आहे, असेही दाभोलकर यांनी निदर्शनास आणून दिले.चार दिवसांच्या आत समस्या सोडविण्याचे आश्वासनगेले अनेक महिने ही बावटाकाठी कलंडलेल्या अवस्थेत असून समुद्रातील मच्छिमारांना या बावटाकाठीचा कोणताही उपयोग होत नाही, असे राजन दाभोलकर यांनी सांगत नवीन मत्स्य हंगाम जवळ येऊन ठेपला असताना अद्यापही या बावटाकाठीची दुरुस्ती का झाली नाही ? असा सवाल केला.बावटाकाठी व बोयाबाबत सद्यस्थितीची माहिती बंदर निरीक्षकांनी दिल्यानंतर दाभोलकर यांनी सागरी अभियंता व महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे मुख्य सर्व्हेअर प्रकाश चव्हाण यांच्याशी फोनवर चर्चा केली. दाभोलकर यांनी बंदरातील समस्यांबाबत माहिती दिल्यावर चव्हाण यांनी चार दिवसांच्या आत दोन्ही समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. 

 

टॅग्स :MNSमनसेsindhudurgसिंधुदुर्ग