शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

राजकोट किनाऱ्यावर शिव पुतळा उभारण्याचे निश्चित, किल्ले सिंधुदुर्गच्या दिशेने असणार दर्शनी बाजू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2023 15:44 IST

यंदाचा भारतीय नौसेना दिन ४ डिसेंबर रोजी किल्ले सिंधुदुर्गवर साजरा होणार,

मालवण: यंदाचा भारतीय नौसेना दिन ४ डिसेंबर रोजी किल्ले सिंधुदुर्गवर साजरा होणार आहे कार्यक्रमापूर्वी सुमारे ३५ फूट उंचीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा राजकोट समुद्रकिनारी बसविण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा दर्शनीभाग हा किल्ले सिंधुदुर्गच्या दिशेने असणार आहे. छत्रपतींच्या हातात तलवार असलेला पुतळा उभारण्यात येणार आहे. या पुतळ्याचे सादरीकरण मुंबईत झाल्यानंतर पहिल्यांदा पुतळ्याची प्रतिकृती पाहायला मिळाली आहे. पुतळ्याच्या परिसरात किल्ले सिंधुदुर्गप्रमाणे तटबंदी उभारण्यात येणार आहे. संपूर्ण परिसर या शिवकालीन वातावरण निर्माण करणारा बनविण्यात येणार असल्याचीही माहिती उपलब्ध झालेली आहे. यंदाचा नौसेना दिवस छत्रपती शिवाजी महाराजांच्या लौकिकाला साजेसा आणि भव्य दिव्य स्वरुपात झाला पाहिजे, यासाठी सर्व कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्यात यावीत, असे निर्देश उपस्थित अधिकाऱ्यांना पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले आहेत. यामुळे प्रशासनाकडून युद्धपातळीवर कार्यवाही सुरू करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. मालवण शहरात एकही शिवपुतळा नाही छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी व पराक्रमाची साक्ष देत गेली साडेतीनशे वर्षे ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला अरबी समुद्रात डौलाने उभा आहे. येथील किल्ल्यात महाराजांचे शिवराजेश्वर मंदिर आहे. म्हणूनच 'किल्ले सिंधुदुर्ग'ला असंख्य शिवप्रेमी खरेखुरे राष्ट्रीय 'शिवस्मारक' मानतात. छत्रपती शिवाजी महाराज खऱ्या अर्थाने भारतीय नौदलाचे जनक आहेत. ते तमाम मराठीजनांचे स्फूर्तिस्थान आहेत. मालवण शहर छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पुनित झालेले आहे. मात्र, शहर व शिवलंका किल्ले सिंधुदुर्गवर छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा अद्याप उभारला गेला नसल्याची खंत शिवप्रेमींच्या मनात होती. भारतीय नौदलाने राजकोट समुद्रकिनारी पुतळा बसविण्याचा निर्णय घेतल्याने आज सर्वत्र आनंदी वातावरण पसरले आहे. पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण? पुतळ्याचे अनावरण ४ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होण्याची दाट शक्यता आहे. गतवर्षी २ सप्टेंबर रोजी भारताची स्वदेशनिर्मित सर्वात मोठी विमानवाहू नौका 'विक्रांत'चे उद्घाटन मोदींच्या हस्ते झाले होते. या कार्यक्रमात मोदींच्या हस्ते नौदलाला नवे ध्वजचिन्ह प्रदान करण्यात आले होते. हे ध्वजचिन्ह शिवाजी महाराजांना समर्पित असल्याची घोषणा पंतप्रधानांनी केली होती. नौदलाकडून कार्यक्रम निश्चितराष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत यंदाचा नौसेना दिन सिंधुदुर्ग किल्ल्यावर साजरा करण्यासाठी नौदलाकडून जोरदार हालचाली सुरू आहेत. तसा कार्यक्रमही निश्चित झाला आहे. जिल्हा प्रशासन त्या अनुषंगाने कामालाही लागले आहे. या सोहळ्याच्या प्राथमिक तयारीचा भाग म्हणून वेस्टर्न नेव्हल कमांड फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ दिनेश त्रिपाठी यांनी किल्ला परिसराची पाहणी केली होती. ३ आणि ४ डिसेंबर असे दोन दिवस हा सोहळा रंगेल. मुख्य कार्यक्रम ४ डिसेंबरला होईल. फोटो

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज