शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

शक्तिपीठ महामार्गावरून सावंतवाडीतील जनतेला धोका?, डॉ. जयेंद्र परुळेकर यांची टीका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 14:41 IST

जनतेची दिशाभूल सुरू असल्याचा आरोप

सावंतवाडी : चष्मा कारखाना, सेटऑप बॉक्स, मल्टिस्पेशलिटी हॉस्पिटल यांसारख्या आश्वासनांप्रमाणे शक्तिपीठ महामार्ग मळगाव आणि तिलारीकडे विभागून नेणार, असे गाजर दाखवून सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर जनतेची पुन्हा एकदा दिशाभूल करत आहेत, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते डॉ. जयेंद्र परूळेकर यांनी बुधवारी प्रसिद्धीपत्रकातून केला आहे.डाॅ. परुळेकर यांनी म्हटले की, वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, युवा वर्गात वाढत चाललेली व्यसनाधीनता, आरोग्य व्यवस्थेची खराब स्थिती व परप्रांतीय लोकांच्या ताब्यात जाणाऱ्या जमिनी हे मतदारसंघामधील जनतेचे वेगळेच प्रश्न आहेत, मात्र याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यांनी पुढे सांगितले की आमदारांनी शक्तिपीठ महामार्गाचा मार्ग बदलून आंबोलीमार्गे मळगाव किंवा झिरो पॉइंट येथे आणि तिथून तिलारी व रेडी जेटीपर्यंत नेण्याची विनंती सरकारला केली आहे, परंतु ही एक निव्वळ भूलथाप आहे.ज्या सरकारच्या काळात राज्यातील कंत्राटदारांचे ९० हजार कोटी रुपये आणि जिल्ह्यातील कंत्राटदारांचे ५०० कोटी रुपये थकले आहेत, अशा परिस्थितीत ८६ हजार कोटी रुपयांच्या या महामार्गाची गरज कोणाला आहे? हा महामार्ग जनतेच्या किंवा पर्यटनाच्या फायद्यासाठी नाही, तर सत्ताधारी राज्यकर्त्यांचे उखळ पांढरे करण्यासाठी आहे का? असा शंका त्यांनी व्यक्त केली.डॉ. परुळेकर यांनी एक धक्कादायक बाबही समोर आणली आहे की, भविष्यात सावंतवाडी तालुक्यातून तब्बल सहा महामार्ग जाणार आहेत. यात मुंबई-गोवा महामार्ग, शक्तिपीठ महामार्ग, सागरी महामार्ग, संकेश्वर-बांदा महामार्ग, पनवेल-बांदा महामार्ग आणि सह्याद्री महामार्ग यांचा समावेश आहे.

आमदारांचे मतदारसंघाकडे दुर्लक्षवीजपुरवठा खंडित होणे, युवा वर्गात वाढती व्यसनाधीनता, आरोग्य व्यवस्थेची दुरवस्था आणि परप्रांतीय लोकांकडून मोठ्या प्रमाणावर जमीन खरेदी होत असल्याच्या गंभीर समस्या याकडे आमदारांचे लक्ष नाही, असं डॉ. परुळेकर यांनी म्हटले आहे।