शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा रुग्णालयात अपुरा रक्त साठा : धनंजय चाकुरकर यांची खंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 15:04 IST

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे रक्तच नाही तर संस्कारही संक्रमित होत आहेत. या प्रतिष्ठानच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. मात्र, या जिल्हा रुग्णालयातील रक्त साठवणुकीची यंत्रणा अपुरी पडत आहे, अशी खंत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर यांनी धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केली. यावेळी ३०५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

ठळक मुद्देजिल्हा रुग्णालयात अपुरा रक्त साठा : धनंजय चाकुरकर यांची खंत धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन

सिंधुदुर्गनगरी : डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे रक्तच नाही तर संस्कारही संक्रमित होत आहेत. या प्रतिष्ठानच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. मात्र, या जिल्हा रुग्णालयातील रक्त साठवणुकीची यंत्रणा अपुरी पडत आहे, अशी खंत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर यांनी धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केली. यावेळी ३०५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदांडा यांच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालय येथील नर्सिंग ट्रेनिंग स्कूल येथे मंगळवारी महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अविनाश नलावडे, निवासी शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, रक्तपेढी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश मोरे उपस्थित होते.यावेळी डॉ. चाकुरकर म्हणाले, डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान स्वच्छता अभियान, विहिरींची स्वच्छता, वृक्षारोपण आदींसारखे सामाजिक उपक्रम राबवित आहे. या प्रतिष्ठानचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. या संस्थेच्यावतीने रक्तदानासारखे महान शिबिर आयोजित केले जाते. त्यांच्या या शिबिरांना रक्तदात्यांचा उदंड प्रतिसाद मिळतो.

हे प्रतिष्ठान रक्तदानच करीत नाही तर एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संस्कारही संक्रमित करीत आहे. हे त्यांचे कार्य अभिमानस्पद आहे, असे सांगतानाच या रक्तदानासाठी दाते मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात. मात्र, येथील रक्त साठवणूक करणारी यंत्रणा अपुरी पडत आहे, अशी खंतही डॉ. चाकुरकर यांनी यावेळी व्यक्त केली.रक्तदानाला प्रतिसादडॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने जिल्ह्यात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात ३०५ जणांनी रक्तदान केले. यात जिल्हा रुग्णालय रक्तपेढीसाठी २१०, उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी रक्तपेढीसाठी ६० तर एसएसपीएम मेडिकल कॉलेज पडवे रक्तपेढीसाठी ३५ बाटल्या रक्ताचे संकलन करण्यात आले. 

टॅग्स :Healthआरोग्यsindhudurgसिंधुदुर्ग