शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात अपुरा रक्त साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 16:03 IST

हे प्रतिष्ठान रक्तदानच करीत नाही तर एका पिढीकडून दुसºया पिढीकडे संस्कारही संक्रमित करीत आहे. हे त्यांचे कार्य अभिमानस्पद आहे, असे सांगतानाच या रक्तदानासाठी दाते मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात. यावेळी ३०५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

ठळक मुद्देधनंजय चाकुरकर यांची खंत : धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन या प्रतिष्ठानचे कौतुक करावे तेवढे कमी

सिंधुदुर्गनगरी : डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे रक्तच नाही तर संस्कारही संक्रमित होत आहेत. या प्रतिष्ठानच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. मात्र, या जिल्हा रुग्णालयातील रक्त साठवणुकीची यंत्रणा अपुरी पडत आहे, अशी खंत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर यांनी धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केली. यावेळी ३०५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदांडा यांच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालय येथील नर्सिंग ट्रेनिंग स्कूल येथे मंगळवारी महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अविनाश नलावडे, निवासी शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, रक्तपेढी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश मोरे उपस्थित होते.

यावेळी डॉ. चाकुरकर म्हणाले, डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान स्वच्छता अभियान, विहिरींची स्वच्छता, वृक्षारोपण आदींसारखे सामाजिक उपक्रम राबवित आहे. या प्रतिष्ठानचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. या संस्थेच्यावतीने रक्तदानासारखे महान शिबिर आयोजित केले जाते. त्यांच्या या शिबिरांना रक्तदात्यांचा उदंड प्रतिसाद मिळतो. हे प्रतिष्ठान रक्तदानच करीत नाही तर एका पिढीकडून दुस-या पिढीकडे संस्कारही संक्रमित करीत आहे. हे त्यांचे कार्य अभिमानस्पद आहे, असे सांगतानाच या रक्तदानासाठी दाते मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात. मात्र, येथील रक्त साठवणूक करणारी यंत्रणा अपुरी पडत आहे, अशी खंतही डॉ. चाकुरकर यांनी यावेळी व्यक्त केली.

रक्तदानाला प्रतिसादडॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने जिल्ह्यात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात ३०५ जणांनी रक्तदान केले. यात जिल्हा रुग्णालय रक्तपेढीसाठी २१०, उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी रक्तपेढीसाठी ६० तर एसएसपीएम मेडिकल कॉलेज पडवे रक्तपेढीसाठी ३५ बाटल्या रक्ताचे संकलन करण्यात आले.

 

टॅग्स :konkanकोकणsindhudurgसिंधुदुर्ग