शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: धारगळ ॲसिड हल्ला प्रकरणात नवा ट्विस्ट, संशयिताच्या पत्नीचा आरोप; म्हणाली..

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 16:11 IST

धारगळ ॲसिड हल्ला प्रकरणात नवा ट्विस्ट  

दोडामार्ग : धारगळ गोवा येथे महाविद्यालयीन युवकावर झालेल्या ॲसिड हल्ला प्रकरणात आता नवीन ट्विस्ट आला आहे. आपल्या मुलीला तिचे अश्लील फोटो व व्हिडीओ पाठवून जखमी वृषभ शेट्ये व तिची आई विद्या शेट्ये यांच्याकडून ब्लॅकमेल केले जात होते. त्या नैराशेतूनच तिने आत्महत्या केली. त्यामुळे या दोघांवरही माझ्या मुलीस आत्महत्या करण्यास भाग पाडल्याबद्दल आणि अश्लील व्हिडीओ पाठवून ब्लॅकमेल केल्याच्या गुन्ह्याखाली ती अल्पवयीन असल्याने पॉस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी तक्रार ॲसिड हल्लाप्रकरणी गोवापोलिसांच्या अटकेत असलेला संशयित आरोपी नीलेश देसाईंची पत्नी नेहा देसाई हिने दोडामार्ग पोलिसांकडे केली आहे.तसेच आपली मुलगी निलाक्षी व वृषभ हिचे व्हाॅट्सॲप, इन्स्टाग्राम संभाषण, अश्लील फोटो व व्हिडीओ पोलिसांना दिले. शिवाय आपल्या पतीला केवळ संशयावरून अटक केली आहे; पण या हल्ल्याशी त्यांचा काहीही संबंध नाही, असे प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.आपल्या मुलीचे आणि वृषभ शेट्ये याचे प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधात बिनसल्याने आपली मुलगी निलाक्षी हिने आत्महत्या केली. तिच्या मृत्यूस वृषभच जबाबदार असल्याचा राग मनात ठेवून त्याचा बदला घेण्यासाठी नीलेश देसाई याने तीन दिवसांपूर्वी वृषभवर धारगळ येथे ॲसिड हल्ला केला होता. त्यांनतर त्याला पोलिसांनी अटक केली होती. या घटनेने संपूर्ण गोवा राज्यात खळबळ उडाली होती. सध्या तो पेडणे पोलिसांच्या अटकेत आहे. मात्र, आता संशयितांच्या पत्नीने केलेल्या आरोपांमुळे या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली आहे.गुरुवारी संध्याकाळी उशिरा संशयिताची पत्नी तिच्या नातेवाइकांसह पोलिस ठाण्यात येऊन धडकली. यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, एकनाथ नाडकर्णी, दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण, भाजप तालुकाध्यक्ष दीपक गवस, माजी तालुकाध्यक्ष सुधीर दळवी, सरपंच सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस उपस्थित होते.यावेळी तिने पोलिस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांच्याशी चर्चा केली. माझा पती निर्दोष आहे. त्याचा या प्रकरणाशी कोणताही संबंध नाही. त्याला केवळ संशयावरून अटक करण्यात आली असल्याचे तिने सांगितले. माझी मृत मुलगी निलाक्षी व वृषभ शेट्ये या दोघांचे प्रेमसंबंध होते. वृषभने लग्नाचे आमिश दाखवून तिच्याशी शरीरसंबंध ठेवले. त्याचे व्हिडीओ व फोटो काढून स्वतःकडे ठेवले.

वृषभ करत होता ब्लॅकमेलवृषभच्या आई-वडिलांना हे नाते मान्य नव्हते त्यामुळे त्यांनी लग्नाला नकार दिला, तर वृषभने आपल्या घरच्यांचा लग्नाला विरोध आहे. त्यामुळे मी तुझ्याशी लग्न करणार नाही. मात्र, तरीसुद्धा तुला माझ्याशी शरीर संबंध ठेवावे लागतील अन्यथा मी तुझे अश्लील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करीन, असे सांगून तिला ते पाठवून ब्लॅकमेल करीत होता.

मार्गदर्शन घेऊन कार्यवाही करूत्यामुळे या ब्लॅकमेलिंगमुळेच माझ्या मुलीने विष प्राशन करून आत्महत्या केली. परिणामी, वृषभ शेष्ट्ये व तिच्या आईवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी व पॉस्कोअंतर्गत अश्लील फोटो व्हायरल करण्याच्या धमकीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी तक्रार केली. यावर पोलिस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांनी आपण कायदेशीर मार्गदर्शन घेऊन कार्यवाही करू, असे आश्वासन दिले.