शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळी हंगामासाठी एसटीच्या १२ जादा बसेस- प्रकाश रसाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 11:51 IST

पर्यटन हंगाम आणि शाळांना सुट्टी पडल्याने प्रवाशांच्या मागणीनुसार १५ एप्रिल ते १५ जून या दोन महिन्यांच्या कालावधीसाठी १२ जादा बसेस सोडण्यात आल्या आहेत.  तसेच मुंबई-सिंधुदुर्ग अशा ३ बसेस नियमितपणे सुरू असून एकुण १५ बसेस चाकरमान्यांच्या सेवेत

ठळक मुद्देआॅनलाईन बुकींगची प्रवाशांना संधी

कणकवली :पर्यटन हंगाम आणि शाळांना सुट्टी पडल्याने प्रवाशांच्या मागणीनुसार १५ एप्रिल ते १५ जून या दोन महिन्यांच्या कालावधीसाठी १२ जादा बसेस सोडण्यात आल्या आहेत.  तसेच मुंबई-सिंधुदुर्ग अशा ३ बसेस नियमितपणे सुरू असून एकुण १५ बसेस चाकरमान्यांच्या सेवेत असणार आहेत. महाराष्ट्र परिवहन विभागाच्या बसेसचे बुकींग आॅनलाईन करण्याची संधी प्रवाशांना आहे.  ग्रामीण भागातही वाढत्या भारमानानुसार जादा बसेस सोडण्यात येतील़ दररोजच्या मुख्य चार मार्गांवर जादा बसेस सोडण्यात आल्याची माहिती एसटीचे सिंधुदुर्ग  विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांनी दिली़

       कणकवली येथिल विभागीय कार्यालयात  प्रकाश रसाळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला.  यावेळी विभागीय वाहतूक अधिकारी अभिजित पाटील उपस्थित होते. प्रकाश रसाळ म्हणाले, उन्हाळी हंगाम हा चाकरमानी आणि पर्यटकांसाठी महत्वपुर्ण आहे.  त्या दृष्टीने एसटी प्रशासनाने पुढील दोन महिन्यांचे नियोजन केले आहे. विविध मार्गावर जादा बसेस सोडण्यात आल्या आहेत़ त्यामध्ये कुडाळ-विजापूर २ बसेस, पणजी-निगडी, पणजी-अक्कलकोट, कणकवली-बोरिवली, देवगड-बोरिवली, कुडाळ-बोरिवली, मालवण - निगडी, कणकवली-बेळगाव तसेच रत्नागिरी, इचलकरंजी, गणपतीपुळे, कोल्हापूर या चार लांबपल्याच्या मार्गावर जादा बसेस भारामानानुसार  सोडण्यात आल्या आहेत. या बसेसमध्ये लोकसभा निवडणुकीकरता २४० गाड्या आरक्षित करण्यात आल्यामुळे २२ व २३ एप्रिल रोजी काही प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता असल्याचे प्रकाश रसाळ यांनी सांगितले़  .

       सध्या नियमित विजयदुर्ग-मुंबई, मालवण-मुंबई, देवगड-बोरिवली या तीन गाड्या सुरू आहेत़. तसेच नवीन १२ बसेसची सुरूवात करण्यात आली आहे.

          सिंधुदुर्गात सावंतवाडी-कणकवली, कणकवली-देवगड, मालवण-कुडाळ, कुडाळ-सावंतवाडी या मार्गावर वाढीव भारमानाची  आकडेवारी घेऊन सध्या जादा बसेस सोडण्यात आल्या आहेत. लग्न समारंभासाठी एप्रिलमध्ये १० गाड्या, मे मध्ये १३ गाड्या आणि जून मध्ये १५ गाड्या बुकींग करण्यात आल्या आहेत़ आतापर्यंत ३८ दिवसांचे बुकींग लग्न समारंभासाठी करण्यात आल्याचे अभिजित पाटील यांनी यावेळी सांगितले.तर एसटी च्या या सेवेचा लाभ जास्तीत जास्त प्रवाशानी घ्यावा असे आवाहन प्रकाश रसाळ यांनी केले आहे. 

टॅग्स :state transportएसटीkonkanकोकण