शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: आंब्याच्या बागेत अर्भक सापडले, आशा स्वयंसेविकाच काही काळ बनली माय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 15:14 IST

नाळही होती शिल्लक.., अज्ञात आई-वडिलांच्या विरोधात गुन्हा दाखल

मालवण : कुंभारमाठ माळरानावरील एका आंब्याच्या बागेत स्त्रीजातीचे नवजात अर्भक शुक्रवारी सकाळी सापडून आले. पोलिस पाटील विठ्ठल बावकर यांनी तातडीने पोलिस यंत्रणेला माहिती दिल्यानंतर नवजात अर्भक उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले होते. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी बाळाला जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दरम्यान, पोलिसांनी अज्ञात आई-वडिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. कुंभारमाठ आणि परिसरातील गावांतील गरोदर मातांची आरोग्य विभागाकडून माहिती घेऊन त्यांच्या घरी जात चौकशी सुरू करण्यात आलेली आहे.दरम्यान, ग्रामीण रुग्णालयात नवजात अर्भकाला आणल्यानंतर त्याठिकाणी कार्यरत असणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांनी त्या बालकाला आवश्यक असणारे सर्व उपचार करत मायेचा आधार दिला. बाळाला डॉक्टरांच्या सूचनेनंतर चमचा मधून दूधही पाजण्यात आले होते. मात्र त्याला उपचाराची आवश्यकता असल्याने तातडीने जिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आले होते. नवजात अर्भक सापडल्यापासून जिल्हा रुग्णालयात नेण्यापर्यंतच्या प्रवासात आशा स्वयंसेविकाच तिची माता बनली होती. आपल्या पोटच्या मुलीप्रमाणे आशा स्वयंसेविकांकडून त्या अर्भकाची काळजी घेतली जात होती.

नाळही होती शिल्लक ..स्त्रीजातीचे अर्भक पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास करलकर यांच्या आंबा बागेत रडत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याठिकाणी पोलिस पाटील बावकर गेले. बालकाच्या अंगावर नाळ तशीच शिल्लक ठेवण्यात आली होती. अंगावर गवत लावलेले होते. त्याठिकाणी असलेल्या कांबळी यांच्याकडून ओढणी घेऊन त्या बालकाच्या अंगाभोवती गुंडाळण्यात आली. त्यानंतर पेडणेकर यांच्या कारने बालकास घेऊन ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी यांनी नवजात बालकावर सुश्रूषा केली. त्यानंतर अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत चौकशी सुरू केली होती.

पालकांच्या विरोधात गुन्हा दाखलकोणीतरी अज्ञात पालकांनी त्यांचे नुकत्याच जन्मलेल्या स्त्रीजातीच्या नवजात अर्भकास त्यांच्यावर त्या अर्भकाची देखभालीची कायदेशीरपणे जबाबदारी असताना त्या बालकाचा कोणत्यातरी कारणास्तव संपूर्णपणे परित्याग करून त्याला कुंभारमाठ म्हाडा कॉलनी येथील आंबा बागेतील मोकळ्या जागेत टाकून दिल्याबद्दल त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ९३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रतिज्ञा खोत व सुप्रिया पवार करीत आहेत.आशा स्वयंसेविकांचे महत्त्वपूर्ण योगदानग्रामीण रुग्णालयात नवजात अर्भक सापडल्यानंतर कुमारमाठ परिसरातील आशा स्वयंसेविका अश्विनी नेवाळे आणि प्रणिता भोगावकर यांनी बाळाला आईची माया देत आधार दिला होता. तसेच ज्याठिकाणी सापडून आले होते त्याठिकाणी समिधा कांबळी यांनीही तातडीने आंबा बाग मालकांना माहिती देत त्यांच्या बागेत लहान मूल रडत असल्याचे कळविले होते. आंबा बाग मालक रूपेश करलकर यांनीही गांभीर्याने घेत पोलिस विठ्ठल बावकर यांना माहिती दिली. यामुळे या बाळाला तातडीने उपचार करता येणे शक्य झाले. कुंभारमाठ सरपंच पूनम वाटेगावकर यांनीही यासाठी आवश्यक सहकार्य करत बाळाला रुग्णालयात दाखल करणे व पुन्हा उपचारासाठी नेईपर्यंत जबाबदारीने थांबून मदत केली.