शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या पेन्शनसाठी बेमुदत संप: सिंधुदुर्गात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन, कार्यालयीन कामकाज ठप्प

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: December 14, 2023 16:25 IST

१७ हजार कर्मचाऱ्यांचा सहभाग

सिंधुदुर्ग : जुनी पेन्शन मिळालीच पाहिजेचा नारा देत राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी गुरुवारपासून बेमुदत संपावर गेले आहेत. त्याचप्रमाणे राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर नगरपालिका कर्मचारी समन्वय समिती सिंधुदुर्ग यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्यात आले. या आंदोलनात शेकडोंच्या संख्येने कर्मचारी सहभागी झाले होते.जुन्या पेन्शन या कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या मागणीसह रिक्त पदे भरती, आठव्या वेतन आयोगाचे तत्काळ गठन करणे, अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त्या तत्काळ करणे व इतर १८ मागण्यांसाठी राज्यातील १७ लाख कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर गेले आहेत. याचाच एक भाग म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सरकारी निमसरकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत. या संपकरी कर्मचाऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र येत धरणे आंदोलन केले. यावेळी विविध प्रकारच्या घोषणा देऊन येथील परिसर दणाणून सोडला.

१७ हजार कर्मचाऱ्यांचा सहभागआजच्या या संपात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, सर्व महसूल, तलाठी, ग्रामसेवक, आरोग्य कर्मचारी, आयटीआय, सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा, वस्तू सेवा कर या सह सर्व विभागांचे १७ हजार कर्मचारी सहभागी झाले आहेत.

कार्यालयीन कामकाज ठप्पराज्य सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर गेले असल्याने सरकारी कार्यालयातील सर्व कामे ठप्प झाली आहेत. जिल्हास्तरावर कामासाठी आलेल्या नागरिकांना मात्र आपले काम झाल्याशिवाय मागे परतावे लागले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गPensionनिवृत्ती वेतनGovernmentसरकार