शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

समुद्रकिनाऱ्यांचे आकर्षण वाढतेय..; पर्यटकांची गर्दी, वेंगुर्ल्यात स्थानिकांच्या रोजगारामध्ये वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2024 18:23 IST

प्रथमेश गुरव वेंगुर्ला : सध्या दिवाळीच्या सुट्यांचा हंगाम असून बऱ्याच घराघरामध्ये पै-पाहुण्यांचे आगमन झाले आहे. दिवाळीच्या फराळा सोबतच घरातील ...

प्रथमेश गुरववेंगुर्ला : सध्या दिवाळीच्या सुट्यांचा हंगाम असून बऱ्याच घराघरामध्ये पै-पाहुण्यांचे आगमन झाले आहे. दिवाळीच्या फराळा सोबतच घरातील अबालवृद्धांसोबत गप्पागोष्टीत रमताना आजूबाजूच्या निसर्गसौंदर्याचा ही आस्वाद पाहुणे मंडळींकडून घेतला  जात आहे. त्यामुळे तालुक्यातील  बऱ्याच समुद्रकिनारी सध्या गर्दी दिसून येत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून किनाऱ्यांची मिळणारी माहिती, पारंपरिक खाद्यपदार्थ, स्थानिकांकडून पर्यटकांना मिळणारे आपुलकीचे आदरातिथ्य यामुळे समुद्रकिनाऱ्यांचे आकर्षण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे.

रोजगार मिळण्याची आशादिवाळीच्या सुटीनंतर काही दिवस पर्यटन कमी होण्याची शक्यता असली तरी येत्या काही दिवसांतच नाताळ आणि ३१ डिसेंबर जवळ येत आहे. त्यामुळे काहीशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पर्यटनाला बहर येणार आहे. सध्याचा रोजगार हा हंगामी स्वरूपाचा असला तरी दिवसेंदिवस होणारे बदल आणि पर्यटकांची वाढत जाणारी गर्दी यामुळे भविष्यात निश्चित स्वरूपाचा रोजगार हा किनारी रहाणाऱ्या लोकांना मिळणार असल्याची चिन्हे आहेत.

झुलता पूल पर्यटनवाढीतील दुवावेंगुर्ला शहर आणि नवाबाग यांना जोडणारा झुलता पूल पर्यटनवाढीसाठी महत्त्वाचा दुवा ठरत आहे. सागरेश्वर बिचवरून पर्यटक या झुलता पुलावर हजेरी लावत नजिकच असलेल्या नवाबाग खाडीत जाऊन मनसोक्त आनंद लुटत आहे. तर अलिकडे याचठिकाणी समुद्रात झालेल्या बंधाऱ्यावरून ही फेरफटका मारण्याचा मोह पर्यटकांना आवरत नाही. हे सर्व निसर्गसौंदर्य ‘सेव्ह’ करून ठेवण्यासाठी फोटोसेशन, व्हिडीओ शुटींग, सेल्फी यालाही प्राधान्य दिले जात आहे. हे सर्व प्रत्यक्ष कृतीतून घडविण्यासाठी तासनतास पर्यटक याठिकाणी थांबत आहे.

वेंगुर्ल्यात स्थानिकांच्या रोजगारामध्येही वाढ

  • गेली काही वर्षे ‘पर्यटन’ संकल्पना रूजू होत असतानाच शहरापासून ते ग्रामीण भागापर्यंत  बरेच बदल घडून आले आहेत आणि बदल होण्याची प्रक्रिया सुरू सुद्धा आहे. येथील स्वच्छ समुद्रकिनारे, स्वच्छ हवा यामुळे पर्यटक अशा भागांना पसंती देत आहेत.
  • निसर्गाने मुक्तहस्ते  उधळण केलेल्या सौंदर्याचा मनमुराद आनंद लुटत असताना पर्यटकांना स्थानिक खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता यावा यासाठी स्थानिक लोकांनी आपापले रोजगार सुरू केले आहेत.
  • पारंपरिक वडापाव  आणि भेळपासून ते  गोबी मंच्युरीयन पर्यंत खाद्यपदार्थ पर्यटकांना उपलब्ध झाले आहेत. पर्यटकांचा ही याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने बेरोजगारांना रोजगार प्राप्त झाला आहे.
टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गtourismपर्यटनSea Routeसागरी महामार्ग