शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्गात पावसाची संततधार, ऑरेंज अलर्ट जारी

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: June 24, 2023 14:36 IST

वादळीवारे नसल्याने नुकसान नाही 

सिंधुदुर्ग : जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात दडी मारलेल्या पावसाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल, शुक्रवार पासून चांगलाच कमबॅक केला. आज, शनिवारीही दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. त्यामुळे बळीराजा सुखावला असून पाणीटंचाईची समस्या पूर्णपणे मिटली आहे. वरुणराजाच्या हजेरीमुळे आतुरतेने वाट पाहणाऱ्या नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. मागील दोन दिवसांपासून पावसाची संततधार आगामी दोन दिवस सुरू राहिल्यास नदी, नाल्यामध्ये पाणी वाहू लागणार आहे. दरम्यान, गेल्या दोन दिवसांत पाऊस सुरू असला तरी वादळीवारे, गडगडाट नसल्यामुळे कोणतीही हानी झाल्याची नोंद आपत्ती विभागाकडे झाली आहे.जिल्ह्यात शुक्रवारी रात्री अधूनमधून पावसाची रिपरिप सुरू होती. मात्र, शनिवारी सकाळपासूनच सर्वदूर मान्सूनच्या धारा कोसळत आहेत. दरम्यान, तळकोकणात पावसाचा जोर आणखी वाढणार असून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.आर्द्रा नक्षत्रात जोरदार कमबॅकयावर्षी पावसाने मृग नक्षत्र कोरडे घालवले होते. त्यामुळे जूनचा पहिला पंधरवडा पाऊस गायब होता. मात्र, शुक्रवारी आर्द्रा नक्षत्रास प्रारंभ झाल्यानंतर जिल्ह्याच्या सर्वच भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सकाळपासून जिल्ह्यातील कणकवली, मालवण, कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यात संततधार पाऊस पडत आहे. कणकवली शहरात महामार्गावरील उड्डाणपुलामुळे कृत्रिम धबधबे निर्माण झाले आहेत. पुलावरील पाणी खाली कोसळत असल्यामुळे त्याचा त्रास वाहनधारक आणि पादचाऱ्यांना होत आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRainपाऊस