शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

खारेपाटण येथे घनकचरा प्रकल्पाचा प्रारंभ,५०० रुपये दंड आकारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2021 10:43 IST

Garbage Disposal Issue sindhudurg-खारेपाटण ग्रामपंचायतीच्यावतीने १५ व्या वित्त आयोगातून सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचा प्रारंभ खारेपाटण गावचे सरपंच रमाकांत राऊत यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आला.

ठळक मुद्दे खारेपाटण येथे घनकचरा प्रकल्पाचा प्रारंभ,५०० रुपये दंड आकारणारउघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर होणार कारवाई

खारेपाटण : खारेपाटण ग्रामपंचायतीच्यावतीने १५ व्या वित्त आयोगातून सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचा प्रारंभ खारेपाटण गावचे सरपंच रमाकांत राऊत यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आला.यावेळी उपसरपंच इस्माईल मुकादम, सामाजिक कार्यकर्ते महेश कोळसुलकर, संकेत शेट्ये, ग्रामपंचायत सदस्य महेंद्र गुरव, शंकर राऊत, अंजली कुबल, रिना ब्रम्हदंडे, ग्रामविकास अधिकारी जी. एस. वेंगुर्लेकर, निलेश गुरव आदी उपस्थित होते.यापुढे सार्वजनिक ठिकाणी गावात उघड्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येणार असून, अशी व्यक्ती आढळल्यास ५०० रुपये दंड आकारण्यात येणार असल्याचे सूचना फलक खारेपाटण ग्रामपंचायतीच्यावतीने गावात लावण्यात आले आहेत.खारेपाटण मासळी मार्केट इमारतीच्या पाठीमागील भूखंडात घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी एकूण ४ मोठ्या चिरेबंदी पक्क्या बांधकामाच्या टाक्या बांधण्यात आल्या आहेत.यामध्ये कुजलेली भाजी व फळे, भाज्यांची पाने, देठ, लिंबू व फळांचा चोथा, शिल्लक अन्न, अंड्यांची कवचे, चिकनचा टाकाऊ भाग, कुजलेली फुले, निर्माल्य, नारळाची सोडणे, शिल्लक नाशवंत टाकाऊ मासे आदी घाण कचरा व वस्तू या टाक्यांमध्ये टाकण्यात येणार असून, ओला कचरा व सुका कचरा याकरिता वेगवेगळ्या स्वतंत्र टाक्या बांधण्यात आल्या आहेत.एक पाऊल स्वच्छतेकडेखारेपाटण ग्रामपंचायतीच्यावतीने एक पाऊल स्वच्छतेकडे या उपक्रमाअंतर्गत गावातील कचरा आता एकाच ठिकाणी संकलित करण्यात येणार आहे. १५ व्या वित्त आयोगातून सुमारे ६० हजार रुपये खर्च करून हा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प निर्माण करण्यात आला आहे.

गावातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने व खारेपाटण शहरात सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविण्यास याद्वारे सुरुवात करण्यात आली आहे, अशी माहिती खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत यांनी यावेळी दिली. 

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नsindhudurgसिंधुदुर्ग