शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

मालवण पर्यटन महोत्सवाचे उद्या पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन, समारोपाला केंद्रीय मंत्री नारायण राणेंची उपस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2022 14:08 IST

तीन दिवस हा महोत्सव सुरु राहणार असून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

मालवण : मालवण नगरपरिषदेच्या वतीने दांडी बीच येथे आयोजित करण्यात आलेल्या “जल्लोष २०२२” पर्यटन महोत्सवाचे उद्घाटन उद्या, शुक्रवारी (दि.१३) सायंकाळी ६ वाजता राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे. माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर आणि मुख्याधिकारी तथा प्रशासक संतोष जिरगे यांनी याबाबत माहिती दिली.तीन दिवस हा महोत्सव सुरु राहणार असून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तर रविवारी १५ मे रोजी सायंकाळी ६ ते ९ यावेळेत केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत या महोत्सवाचा समारोप होणार आहे.शुक्रवारी सायंकाळी होणाऱ्या उद्घाटन सोहळ्याला खा. विनायक राऊत यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून प्रमुख पाहुणे म्हणून आमदार वैभव नाईक, आमदार नितेश राणे, विधानपरिषद आमदार अनिकेत तटकरे, बाळाराम पाटील, निरंजन डावखरे, जिल्हाधिकारी श्रीमती के. मंजुलक्ष्मी, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे उपस्थित राहणार आहेत. तर १५ मे रोजी होणाऱ्या समारोप सोहळ्याला आमदार वैभव नाईक, आमदार दीपक केसरकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.१३ मे रोजी नौका सजावट स्पर्धा, वाळू शिल्प कलाकृती, सायकल रॅली होणार आहे. तर सायंकाळी ४ ते ५ वाजता मालवणी खाद्य पदार्थ पाककला स्पर्धा, सायंकाळी ६ ते १० आमदार वैभव नाईक श्री शरीर सौष्ठव स्पर्धा, गायन स्पर्धा, स्थानिक दशावतार (महिला व पुरुष) होणार आहे. १४ मे रोजी सायंकाळी ४ ते ६ खेळ पैठणीचा तर सायंकाळी ७ ते १० मालवण सुंदरी स्पर्धा आणि नृत्य सादरीकरण होणार आहे.१५ मे रोजी सायंकाळी ५ ते ६ लोककलाकार कार्यक्रम, सायंकाळी ६ ते ७ बक्षीस आणि सांगता समारंभ तर सायंकाळी ७ ते १० यावेळेत “जल्लोष” हा सिनेकलावंतांचा मनोरंजनाचा कार्यक्रम होणार आहे. तरी या महोत्सवाचा पर्यटक, नागरिकानी लाभ घ्यावा, असे आवाहन मालवण नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग