शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग पोलिस मुख्यालयात सायबर पोलिस ठाण्याचे उद्धाटन, आयजींकडून कर्मचाऱ्यांचे कौतुक 

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: March 24, 2023 15:49 IST

सिंधुदुर्ग : कोकण परीक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक प्रविण पवार यांच्या हस्ते येथील पोलिस मुख्यालयात शुक्रवारी सायबर पोलिस ठाण्याचे उद्घाटन ...

सिंधुदुर्ग : कोकण परीक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक प्रविण पवार यांच्या हस्ते येथील पोलिस मुख्यालयात शुक्रवारी सायबर पोलिस ठाण्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पवार यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांची चौकशी करुन त्यांचे कौतुक तर केलेच शिवाय त्यांच्या कामगिरी बद्दल समाधान व्यक्त करुन शुभेच्छा दिल्या.यावेळी पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक नितीन बगाटे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप भोसले, पोलिस निरीक्षक अमित यादव, सायबर पोलिस ठाण्याचे स.पो.नि.बळीराम सुतार यांच्यासह पोलिस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.सुरुवातीला विशेष पोलिस महानिरीक्षक प्रविण पवार यांच्या हस्ते कोनाशिला अनावरण करण्यात आले. त्यानंतर फित कापून पोलिस ठाण्याचे उद्घाटन झाले. पोलिस अधीक्षक अग्रवाल यांनी यावेळी माहिती दिली. परब, तोरसकर यांच्या ज्ञानाचा पोलिस दलाला फायदाआयजी पवार यांनी सायबर पोलिस ठाण्याची पाहणी करत उपस्थित पोलिस कर्मचाऱ्यांची चौकशी केली. यावेळी येथील धनश्री परब या बी.ए.,डी.एड., एल.एल.बी. तर स्वप्नील तोरसकर हा डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक, एल.एल.बी. झाल्याचे सांगितले. यावर आयजींनी या दोघांच्या ज्ञानाचा पोलिस दलास निश्चित फायदा होईल. पोलिस दलात अनेक उच्च शिक्षण घेतलेले कर्मचारी आहेत. विशेषत: घर सांभाळून महिला कर्मचारी आपले शिक्षण घेतात. अशा पोलिस दलाचा निश्चितच अभिमान आहे. याचा फायदा गुन्ह्याची उकल करताना होणार आहे. अशा शब्दात कौतुक करुन शुभेच्छा व्यक्त केल्या.सायबर पोलिस ठाण्याचे स.पो.नि. बळीराम सुतार यांनी सायबर पोलिस ठाणे निर्माण करण्याचा हेतू विषद करुन जिल्ह्यातील सायबर गुन्हांच्या तपासाचा आढावा सादर केला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गcyber crimeसायबर क्राइमPoliceपोलिस