शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कुडाळमध्ये  ६ जूनला ‘शासन आपल्या दारी’, पालकमंत्र्यांनी सूक्ष्म नियोजनाच्या दिल्या सूचना

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: June 1, 2023 19:19 IST

आरोग्य विभागाने सतर्क राहून जबाबदारी पाळावी

सिंधुदुर्ग : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ६ जून रोजी कुडाळ येथे होणाऱ्या जिल्ह्याच्या ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाचे सूक्ष्म नियोजन करा, विशेषत: आरोग्य विभागाने सतर्क रहावे, अशी सूचना पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली.‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमासाठी ६ जून रोजी होणाऱ्या मुख्यमंत्री शिंदे यांच्या संभाव्य दौऱ्याच्या नियोजनाबाबत पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दूरदृश्यप्रणालीव्दारे गुरूवारी बैठक घेतली. बैठकीला जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. उदय पाटील, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे आदी उपस्थित होते.जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी सुरुवातीला नियोजनाबाबत माहिती दिली. त्या म्हणाल्या, आरोग्य मेळावा, रोजगार मेळावा, आरोग्य तपासणी शिबिर याबरोबरच विविध विभागांच्या स्टॉलचे नियोजन करण्यात आले आहे. त्याशिवाय वाहनतळ, उपस्थितांसाठी फूड पॅकेट, पाणी, सोबत ओआरएसचे सॅशे, टॉयलेट आदी बाबतही नियोजन करण्यात आले आहे.

आरोग्य विभागाने सतर्क राहून जबाबदारी पाळावीपालकमंत्री चव्हाण म्हणाले, सद्याचे ऊन आणि संभाव्य पाऊस याची दक्षता घेवून त्याबाबत काटेकोर नियोजन करा. येणाऱ्या लाभार्थ्यांसाठी आरोग्य कक्ष उभा करुन सुसज्ज रुग्णवाहिका आवश्यक वैद्यकीय पथक, कर्मचारी, परिचारिका यांना तैनात ठेवा. आरोग्य विभागाने सतर्क राहून जबाबदारी पार पाडावी. येणाऱ्या लाभार्थ्यांसाठी फिरत्या शौचालयांचीही सोय करा.

आवश्यक सुविधा मिळण्यासाठी लक्ष ठेवापालकमंत्री म्हणाले, खासगी वाहनांसाठी वाहन तळाची सुविधा करा तसेच अग्निशमन दलाची वाहनेही उपलब्ध ठेवा. उपस्थित लाभार्थी, पोलिस कर्मचारी यांना पाणी, जेवण याची सुविधा जागेवरच मिळेल याबाबतही दक्षता घ्या. सर्वच यंत्रणांनी काटेकोरपणे नियोजन करावे. आवश्यक त्या सर्व सुविधा उपस्थितांना मिळतील याकडे लक्ष ठेवून हा कार्यक्रम यशस्वी करा, असेही ते म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गkudal-acकुडाळChief Ministerमुख्यमंत्री