शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

परशुराम उपरकरांच्या उपस्थितीत कुडाळमध्ये येत्या रविवारी निर्धार मेळावा 

By सुधीर राणे | Updated: February 15, 2024 17:38 IST

कणकवली: नववर्षाच्या सुरुवातीलाच आम्ही मनसेच्या आजी - माजी पदाधिकाऱ्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेत असताना राज ...

कणकवली: नववर्षाच्या सुरुवातीलाच आम्ही मनसेच्या आजी - माजी पदाधिकाऱ्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेत असताना राज ठाकरे यांच्यावरील प्रेम आणि निष्ठा तेव्हाही कायम होती आणि आताही कायम आहे. परंतु पक्षात जमलेल्या काही बांडगुळानी पक्ष संघटना प्रायव्हेट लिमिटेड कंपनी बनवली आहे.त्यामुळे आम्ही माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या उपस्थितीत कुडाळ येथे रविवारी (दि.१८) सकाळी ११ वाजता 'निर्धार मेळावा'  घेत आहोत.  लोकसभा निवडणुकीपूर्वी पुढील दिशेबाबतचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती प्रसाद गावडे व मनसेच्या माजी कार्यकर्त्यांनी येथे दिली.कणकवली येथे गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आशिष सुभेदार, विनोद सांडव, आबा चिपकर, आप्पा मांजरेकर, राकेश टँगसाळी, मंदार नाईक, बाबल गावडे, प्रकाश साटेलकर, दीपक गावडे, नाना सावंत, बाळकृष्ण ठाकूर, गणेश गावडे आदींसह मनसे माजी पदाधिकारी उपस्थित होते.आमचा हा मेळावा कार्यकर्त्यांचा स्वाभिमान जपणारा आणि निष्ठेला बळ देणारा तसेच परशुराम उपरकर यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा असणार आहे. मात्र,आगामी काळात नेमके कोणत्या दिशेने जायचे हे तो मेळावा झाल्यानंतर एकत्र बसून ठरविणार आहोत. सध्याच्या राजकीय परिस्थितीचा विचार करता लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी आम्ही निर्णय घेणार आहोत.मनसेमध्ये सच्चा कार्यकर्त्यांना बाजूला करत स्वतःच्या मर्जीतले आयाराम, गयाराम लोक नेमण्याचे कार्य सुरू करण्यात आले. त्यामुळे पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय आम्ही घेतला होता. मात्र पुढची दिशा कोणती घेणार? याबाबत कुठलाही निर्णय आम्ही घेतलेला नव्हता. जिल्ह्यातील जवळपास ८० टक्के मनसे पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याने या सर्व पदाधिकाऱ्यांची मते आणि विचार जाणून घेण्यासाठी १८ फेब्रुवारी रोजी कुडाळ ओंकार डिलक्स येथील सभागृहात निर्धार मेळावा आयोजित केला आहे.या मेळाव्यासाठी जिल्ह्यातील ग्रामस्तरीय पदाधिकारी सुद्धा उपस्थित राहणार आहेत. मेळाव्याला माजी आमदार परशुराम उपरकर यांना देखील निमंत्रित करून आमच्या भावना जाहीर व्यासपीठावर व्यक्त करणार आहोत असेही प्रसाद गावडे यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गMNSमनसेParshuram Upkarपरशुराम उपरकर kudal-acकुडाळ