शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

भविष्यात मंत्रिमंडळाची बैठक जेलमध्ये घ्यावी लागेल, विनायक मेटेंची बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2022 19:44 IST

भाजपच्या नेत्यांवर बिनबुडाचे आरोप करण्यापेक्षा पुरावे असतील तर द्यावेत असे आव्हान देखील दिले

सावंतवाडी : सध्या महाविकास आघाडी सरकारच्या एका एका मंत्र्याला भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात जावे लागत आहे. त्यावरून भविष्यात कदाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना संपूर्ण मंत्रिमंडळाची बैठकच तुरूंगात घ्यावी लागते की काय अशी बोचरी टीका  शिवसंग्रामचे नेते आमदार विनायक मेटे यांनी महाविकास आघाडीवर केली. तर, भाजपच्या नेत्यांवर बिनबुडाचे आरोप करण्यापेक्षा पुरावे असतील तर द्यावेत असे आव्हान देखील दिले. सावंतवाडीत प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.आमदार मेटे हे आंगणेवाडी येथील भराडी देवीच्या यात्रेला आले असता त्यांनी सावंतवाडीला भेट दिली. यावेळी शिवसंग्रामचे सिंधुदुर्ग अध्यक्ष सुरेश गवस, उदय भोसले, सत्यजित धारणकर, रजनी निर्मल, विनोद पावसकर, प्रफुल्ल पवार, दिपक कदम, गुरुनाथ कामत आदि उपस्थित होते.मेटे म्हणाले, महाविकास आघाडी सरकार हे अन्याय करणारे सरकार असून फॅमिली सरकार आहे. या सरकारला कोणत्याही समाजमनाचे काही पडले नाही. गेल्या अडीच वर्षांत मराठा समाजा बाबत कोणतीही भुमिका घेतली नाही, मराठा समाजातील कोणत्याही नेत्याशी बोलायला याना वेळ नाही. त्यामुळेच आता आम्ही आरक्षण मिळावे यासाठी रस्त्यावर उतरण्याची भूमिका घेतली आहे. येत्या अधिवेशनात या सरकारला जाब विचारू.अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याचे ठरलेले असताना या सरकारने गेल्या अडीच वर्षात एक मिनिट ही बैठक या स्मारकाबद्दल घेतली नाही. त्याची कोणतीही पूर्तता केली नाही. फक्त मतांसाठी प्रत्येक घटकाचा वापर केला जात आहे.

मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले नाही, ओबीसी समाजाला ही असेच झुलवत ठेवले. मुस्लिम समाजाचा वापर काँग्रेस फक्त मतासाठी करत आला आहे. धनगर समाजालाही सरकारने आरक्षण दिले नाही. त्यामुळेच आता आम्ही शिवसंग्राम च्या वतीने रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतल्याचे मेटे यांनी सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गVinayak Meteविनायक मेटेMahavikas Aghadiमहाविकास आघाडी