शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg Crime: कारागृहातून शिक्षा भोगून सुटला, दुचाकी चोरी प्रकरणात सापडला

By अनंत खं.जाधव | Updated: June 13, 2023 19:19 IST

सावंतवाडी : सावंतवाडी येथील दुचाकी चोरी प्रकरणात चक्क आईच्या खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगून आलेल्या सोनुर्ली येथील गौरेश बाळकृष्ण परब ...

सावंतवाडी : सावंतवाडी येथील दुचाकी चोरी प्रकरणात चक्क आईच्या खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगून आलेल्या सोनुर्ली येथील गौरेश बाळकृष्ण परब यांचा समावेश असल्याने एकच खळबळ उडाली. त्याला निरवडे येथून अटक करण्यात आली आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून करण्यात आली.उद्या, बुधवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. आपल्याकडे काहीच पैसे नसल्यामुळे आपण हा प्रकार केल्याचे त्याने पोलिसांसमोर कबूली दिली आहे. नोव्हेंबर महिन्यात तो कारागृहातून शिक्षा भोगून सुटला होता.येथील खासकीलवाडा येथील हॉटेल व्यावसायिक हितेन नाईक यांची १० तारखेला मॅगो २ हॉटेल कडून दुचाकी चोरीला गेली होती. याबाबतची तक्रार त्यांनी सावंतवाडी पोलिसात दिली होती. त्यानुसार नाईक यांच्यासह सावंतवाडी पोलिस तपास करीत होते. दरम्यान तपासा दरम्यान नाईक यांना संबधित युवक हा आपली दुचाकी घेवून जाताना दिसला. त्यानुसार त्यांनी त्याची माहिती घेतली असता तो सोनुर्ली येथील असल्याचे समजले तसेच तो निरवडे येथे भाड्याने राहत असलेल्या ठिकाणी त्याची गाडी वीना नंबर प्लेट दिसली. त्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली.यावेळी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा आणि सावंतवाडी पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत त्याला निरवडे येथील भाड्याच्या घरातून ताब्यात घेतले आहे. दरम्यान त्याच्याकडे चौकशी केली असता आपल्याकडे पैसे नसल्याने ती गाडी चोरल्याची कबूली त्याने पोलिसांना दिली.त्याने दहा वर्षापुर्वी भावाभावांच्या भांडणात आईचा खून केला होता. या प्रकरणी तो गेली दहा वर्षे सावंतवाडी कोल्हापूर, धुळे नाशिक आदी ठिकाणी जेल मध्ये होता. नोव्हेंबर महिन्यात तो सुटला होता. मात्र घरातील व्यक्ती सोबत त्याचे पटत नसल्यामुळे निरवडे येथील एका दुकानात तो काम करीत होता. पैसे नसल्यामुळे आपण हा प्रकार केला असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. दरम्यान या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली असून त्याने आणखी काही गाड्या चोरल्या का? याचा तपास पोलिस करणार आहेत. ही कारवाई सहाय्यक पोलिस निरिक्षक गुरूनाथ कोयंडे, प्रकाश कदम, प्रमोद काळसेकर, चंद्रकांत पालकर आदींनी केली. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCrime Newsगुन्हेगारी