शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंच्या मताला दिल्लीत वजन, मागणीची तत्काळ दखल; इंडिया आघाडीची होणार लवकरच बैठक
2
जनसुरक्षा विधेयकाला कडाडून विरोध का केला नाही, हायकमांडची नोटीस? काँग्रेस नेते म्हणाले...
3
Patna Hospital Firing: रुग्णालयात घुसले, रिव्हॉल्वर काढल्या... 64 सेकंदात हत्या करून फरार; बघा सीसीटीव्ही व्हिडीओ
4
गोपीचंद पडळकर यांच्यासोबत वाद काय झाला? जितेंद्र आव्हाडांनी सगळंच सांगितलं
5
"मे-जून महिन्यात शेतकरी रिकामी, त्यामुळे वाढले खुनाचे गुन्हे", पोलीस अधिकाऱ्याचं वादग्रस्त विधान   
6
हिंदू बनून फसवलं, सौदीत विकण्याचा डाव, धर्म बदलला नाही म्हणून गँगरेप; पीडितेने सांगितला थरारक प्रसंग
7
फहाद फासिलचा "१७ वर्षे जुना कीपॅड फोन" चर्चेत; किंमत ऐकून चक्रावून जाल...
8
"आम्ही भारताचे १०-२० जेट सहज पाडले असते, पण..."; बिलावल भुट्टो-ख्वाजा आसिफ यांचा हास्यास्पद दावा!
9
काय बुद्धी सुचली...! १ कोटी पगाराची नोकरी सोडली आणि सिक्युरिटी गार्ड बनला हा व्यक्ती, कशासाठी हा खटाटोप...
10
Video: 6.6.6.6.2.6...; राजस्थानच्या पठ्ठ्यानं मैदान गाजवलं, एकाच षटकात ठोकले ५ षटकार!
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रामक टॅरिफ धोरणापुढे 'ड्रॅगन' फुस्स...; अमेरिकेची चांदी, झाला अब्जावधी डॉलर्सचा नफा
12
CM फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या ऑफरवर संजय राऊत थेट बोलले, म्हणाले, “तुम्ही आधी...”
13
नर्स निमिषा प्रियाची फाशी तात्पुरती स्थगित, पण मृत तलालचा भाऊ ऐकेचना! आता म्हणाला...
14
"राज्यात गुटखाबंदी असल्याचे म्हणणं हास्यास्पद"; भाजप आमदाराने सरकारलाच घेरलं; म्हणाले, 'कुठेही जा...'
15
"बाळासाहेब म्हणाले, उद्या मी शिवसेना सोडली तर...?"; निष्ठेचा मुद्दा, अंबादास दानवेंनी सांगितला २००४ मधील किस्सा
16
इस्रायलचा सीरियावर हल्ला; Baba Vanga चे भाकित खरे ठरले, तिसऱ्या महायुद्धाची चाहुल..?
17
Water Cut: महत्त्वाची बातमी! मुंबईत १२ तास आणि नवी मुंबईत १८ तास पाणीपुरवठा राहणार बंद
18
एअर इंडियाच्या कॅप्टननेच इंधन स्वीच बंद केला; को-पायलटचा कापरा आवाज...; अमेरिकी रिपोर्टमध्ये मोठा दावा
19
Video - ना हेलिकॉप्टर, ना रुग्णवाहिका, विद्यार्थ्यांनी लढवली शक्कल; शिक्षिकेसाठी केलं असं काही...
20
सावधान! खोटे टॅक्स क्लेम केलेल्यांना आयकरच्या AI ने पकडले; भरावा लागेल २००% दंड आणि ७ वर्षांपर्यंत जेल!

मालवणच्या नगराध्यक्षांना कारावास

By admin | Updated: May 28, 2016 01:01 IST

मयेकर मारहाण प्रकरण : एक महिन्याची शिक्षा, मुलगाही दोषी

मालवण : मारहाण प्रकरणातील गुन्ह्यात दोषी ठरविताना मालवणचे नगराध्यक्ष अशोक लाडोबा तोडणकर (वय ५५) यांना मालवण न्यायालयाने एक महिना साधा कारावास व एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दीड वर्षांपूर्वी घडलेल्या याच मारहाण प्रकरणातील गुन्ह्यात त्यांचा मुलगा गणेश अशोक तोडणकर यालाही दोषी ठरविताना तीन महिन्यांचा साधा कारावास व सात हजार रुपये दंड, अशी शिक्षा सुनावताना यातील हेमंत मिठबावकर या संशयिताची निर्दोष मुक्तता केली. दरम्यान, अशोक तोडणकर व गणेश तोडणकर यांना तात्पुरत्या स्वरूपाचा १५ हजारांचा वैयक्तिक जामीन मंजूर करण्यात आला आहे. वरिष्ठ न्यायालयात या शिक्षेविरोधात अपील करेपर्यंत हा जामीन कायम राहणार आहे, तर या शिक्षेविरोधात जिल्हा न्यायालयात दाद मागणार असल्याचेही तोडणकर यांच्या वकिलाने स्पष्ट केले.१९ आॅक्टोबर २०१४ रोजी विधानसभा निवडणूक निकालानंतर वैभव नाईक यांच्या विजयानिमित्त फटाके वाजवत असताना हा वाद घडला होता. याबाबत मयेकर कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीत अशोक तोडणकर, गणेश तोडणकर, हेमंत मिठबावकर या तिघांनी अश्लील शिवीगाळ करून तुळशीदास मयेकर, तपस्वी मयेकर यांना दांड्याने, लाथाबुक्क्याने मारहाण करून त्यांच्या गळ्यातील चैनही तोडली होती, असे म्हटले होते. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर रात्री उशिरा नगराध्यक्ष अशोक तोडणकर यांनी दिलेल्या तक्रारीत असे म्हटले होते की, वैभव नाईक यांच्या विजयानंतर तुळशीदास मयेकर कुटुंबीयांनी आपल्या दारात फटाके फोडले. त्याची विचारणा केली असता आपणास व आपला मुलगा यांना दांड्याने जबर मारहाण करून हाताचा चावा घेतला. या मारहाणीत मुलाचे सोन्याचे ब्रेसलेट, चैन गहाळ झाली. या प्रकरणी तपस्वी मयेकर, भाई मालंडकर, गौरी मयेकर, तृप्ती मयेकर, तुळशीदास मयेकर, (सर्व रा. वायरी मालवण) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानुसार तोडणकर यांना ३२३ व ३४ कलमांन्वये एक महिना साधा कारावास व एक हजाराचा दंड, तर मुलगा गणेश तोडणकर याला दोषी ठरवताना प्रत्येकी एक महिना, असा तीन महिन्यांचा कारावास एकत्र स्वरूपात भोगणे व सात हजारांचा दंड ठोठावण्यात आला. तसेच शिक्षा कारवाईनंतर दंड रकमेपैकी पाच हजार रुपये फिर्यादीस देण्याबाबतही न्यायालयाने आदेश दिले आहेत. पाचही जणांची निर्दोष मुक्ततातोडणकर मारहाणप्रकरणी परस्परविरोधी तक्रारीनुसार तपस्वी मयेकर, भाई मालंडकर, गौरी मयेकर, तृप्ती मयेकर, तुळशीदास मयेकर या सर्वांवर तोडणकर यांना मारहाण व अन्य गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र, सबळ पुराव्याअभावी या पाचही जणांची शुक्रवारी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.