शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

माझी लढाई व्यक्ती नाही; तर प्रवृत्तीविरोधात : केसरकर, वाढदिनी मान्यवरांकडून शुभेच्छा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 12:04 IST

सिंधुदुर्गात करण्यासारखे भरपूर आहे. फक्त येथील जनतेची साथ मिळाली तर यापेक्षा आणखी काम करून दाखवेन, आता विकासाची गंगा तुमच्यापर्यंत पोहोचण्यास सुरूवात होणार आहे. तुमच्या प्रेमाची उतराई ही मला तुमच्या कल्याणातून करायची आहे, असे भावनिक उद्गार राज्याचे गृहराज्यमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी काढले.

ठळक मुद्दे माझी लढाई व्यक्ती नाही; तर प्रवृत्तीविरोधात : दीपक केसरकर वाढदिनी मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव

सावंतवाडी : अधिकाऱ्यांना मारहाण झाली तर अधिकारी पुन्हा जिल्ह्यात येणार नाही. त्यामुळेच जिल्ह्यातील महत्त्वाची अनेक पदे रिक्त आहेत. माझी लढाई ही व्यक्तीशी नसून प्रवृत्तीशी आहे. त्यामुळे काही प्रसंगात मला कठोर व्हावे लागते. सिंधुदुर्गात करण्यासारखे भरपूर आहे. फक्त येथील जनतेची साथ मिळाली तर यापेक्षा आणखी काम करून दाखवेन, आता विकासाची गंगा तुमच्यापर्यंत पोहोचण्यास सुरूवात होणार आहे. तुमच्या प्रेमाची उतराई ही मला तुमच्या कल्याणातून करायची आहे, असे भावनिक उद्गार राज्याचे गृहराज्यमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी काढले.मंत्री दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने सावंतवाडी येथील बॅ. नाथ पै सभागृहात चांदा ते बांदा योजनेतून जॅम्प नेटवर्कच्या माध्यमातून बचतगटांना कोंबडीची पिल्ले तसेच नोकरीचे पत्र देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी पत्नी पल्लवी केसरकर, राज्याचे मत्स्य व पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर, आमदार वैभव नाईक, माजी केंद्रीय कायदामंत्री रमाकांत खलप, माजी आमदार अजित गोगटे, जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे, पोलीस अधीक्षक दिक्षीतकुमार गेडाम, मुख्यकार्यकारी अधिकारी के. मंजुलक्ष्मी, मालवण नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, उद्योजक नंदूशेठ घाटे, जिल्हा परिषद सदस्य अमरसेन सावंत, युवानेते संदेश पारकर, जिल्हा परिषद सदस्य नागेंद्र परब, सचिन वालावलकर, उद्योजक हर्ष साबळे, प्रांताधिकारी सुशात खांडेकर, नगरपालिका मुख्याधिकारी जयंत जावडेकर, तहसीलदार राजाराम म्हात्रे, उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, ज्येष्ठ नगरसेविका अनारोजीन लोबो, वहिनी शितल केसरकर, मुलगी सोनाली केसरकर, जावई रोहन वगळ, कुडाळ सभापती राजन जाधव, अश्विन राऊत, तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, शहरप्रमुख बाबू कुडतरकर, नगरसेवक सुरेंद्र बांदेकर माजी नगरसेवक गोविंद वाडकर आदी उपस्थित होते.यावेळी मंत्री केसरकर म्हणाले, जनतेच्या आशीर्वादाने मला काम करण्याची संधी मिळाली चांदा ते बांदा या योजनेतून जनतेचे कल्याण करण्याची संधी आली आहे. त्यामुळेच यातून वेगवेगळ््या योजना राबविण्याचे काम सुरू आहे. मी निधी आणला पण त्यांची प्रसिद्धी केली नाही. कुठल्या ही क्षेत्रात निधी कमी पडणार याची मी नेहमी काळजी घेतली आहे. काही जण टीका करतात पण त्यातून मी अभ्यास केला. बोलणारे काम करत नाही न बोलणारे अधिक काही तरी करून दाखवत असतात असे ही त्यांनी यावेळी सांगितले. जनतेच्या प्रेमाची उतराई विकासातून करायची असते असे सांगत कोणा विरोधात मी कडक भुमिका घेत नाही. कधी ही पदाचा गैरवापर केला नाही, आणि करणार ही नाही.पण एखादे काम होत असताना त्याला विरोध करू नका. सावंतवाडीतील रस्त्याचे काम काही जणांनी बंद पाडले हे अयोग्य होते. आता त्या रस्त्यांची कामे सावकाश होणार याला जबाबदार कोण असा सवाल त्यांनी केला. माझी लढाई ही व्यक्ती विरोधात नसून प्रवृत्ती विरोधात असल्याचेही यावेळी मंत्री केसरकर यांनी सांगितले.

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर sindhudurgसिंधुदुर्ग