शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

लाकडाच्या भुसामधून ३७ लाखांची अवैध दारू वाहतूक, दोघांवर गुन्हा; वैभववाडी पोलिसांची करुळ नाक्यावर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 14:11 IST

गेल्या महिनाभरातील ही चौथी मोठी कारवाई

वैभववाडी : करूळ तपासणी नाक्यावर वैभववाडी पोलिसांनी ३६ लाख ९६ हजार रुपये किमतीची दारू पकडली. याप्रकरणी दारूसह ५९ लाख ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई मंगळवार ५ रोजी सकाळी पावणेसहा वाजण्याच्या करण्यात आली. कंटेनरमधून लाकडाचा भुसा वाहतुकीचा दिखावा करून ११०० बॉक्स दारू वाहतूक सुरू होती. गेल्या महिनाभरातील ही चौथी मोठी कारवाई आहे.करूळ तपासणी नाक्यावर हवालदार रणजित सावंत, पोलिस शिपाई समीर तांबे, हाके हे कार्यरत होते. वाहनांची तपासणी सुरू असताना पहाटे पावणेसहा वाजण्याच्या सुमारास वैभववाडीहून गगनबावड्याच्या दिशेने निघालेला कंटेनर (क्रमांक आरजे ५३, जी/ए ०५५२) नाक्यावर आला. पोलिसांनी चालक नवीन सुरेश कुमार (२९, रा. कदम, ता. भिवानी, जि. भिवानी-हरियाणा) याच्याकडे कंटेनरमधील मालाविषयी विचारणा केली असता त्याने ‘बायोमास फ्युअल क्रिक्स’ असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याच्याकडे पावतीची विचारणा केली असता तो संदर्भहिन बोलू लागला. त्यामुळे त्याच्यासोबत असलेल्या वीरेंद्र भरत सिंग (४२ रा. हजमपूर, ता. हंसी, जि. हिंसार- हरियाणा) याच्याकडे विचारणा केली. मात्र त्याच्याकडूनही समर्पक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे कंटेनर उघडण्यास सांगितला.कंटेनर उघडला असता पोलिसांना सुरुवातीला लाकडाचा भुसा भरलेल्या सफेद रंगाच्या पिशव्या आढळल्या. त्यातील काही पिशव्या बाजूला केल्यावर कंटेनरच्या आत लोखंडाला प्लायवूड बसविलेला स्वतंत्र मोठा कप्पा दिसला. तो उघडल्यावर पोलिस चक्रावून केले. पूर्ण कप्प्यात दारूचे बॉक्स आढळून आले. त्यामुळे याची माहिती पोलिस ठाण्यात दिल्यानंतर प्रभारी अधिकारी तथा सहाय्यक पोलिस निरीक्षक जी.जी. माने, पोलिस शिपाई हरीष जायभाय नाक्यावर पोहोचले. त्यानंतर हा कंटेनर पोलिस ठाण्यात आणला.कंटेनरमधील बॉक्सची मोजणी करण्यात आली. साधारणपणे दोन तास ही प्रकिया सुरू होती. कंटेनरमध्ये दारूचे ११०० बॉक्स आढळून आले. प्रत्येक बॉक्समध्ये ४८ वेगळे बॉक्स होते. ही दारू ३६ लाख ९६ हजार रुपये किमतीची असून कंटेनरसह ५९ लाख ९६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून दोन्ही संशयितांविरोधात गुन्हा नोंदविला आहे.

सर्वात मोठी कारवाईवैभववाडी पोलिसांनी गेल्या काही दिवसांपासून अवैध दारू वाहतुकीविरोधात धडाकेबाज कारवाई सुरू केली आहे. संभाजी चौक, कुसुर पिंपळवाडी, करूळ तपासणी येथे दारू पकडली होती. त्यानंतर ही चौथी कारवाई असून आतापर्यंतची वैभववाडी पोलिसांची सर्वात मोठी कारवाई आहे.