शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
2
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
3
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
4
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
5
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
6
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
7
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
8
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
9
Samudrik Shastra: सामुद्रिक शास्त्रानुसार हसण्याच्या पद्धतीवरून ओळखता येतात माणसाचे गुण-दोष!
10
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
11
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
12
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
13
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
14
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
15
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
16
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
17
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
18
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
19
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
Daily Top 2Weekly Top 5

अवैध दारूची वाहतूक; तिघे ताब्यात

By admin | Updated: October 3, 2015 22:52 IST

स्कॉर्पिओ पकडली : लाखाची दारू जप्त

सावंतवाडी : दाणोली- बांदा मार्गावरील बावळाट तिठा येथे अवैधरीत्या गोवा बनावटीची दारू वाहतूक करणारी सोलापूर येथील पर्यटकांची स्कॉर्पिओ कार वाहतूक पोलिसांनी पकडली. यात एक लाख रुपये किमतीची दारू आढळून आली आहे. ही कारवाई शनिवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास करण्यात आली आहे. याप्रकरणी तिघा पर्यटकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गोव्याहून स्कॉर्पिओ कारने सोलापूरच्या दिशेने जाणारे भिरुदेव दादा सलगर (वय ३६), अण्णा भीवा कोकरे (२९), बंडू लिंगदेव यादव (२४) यांच्याकडे गोवा बनावटीची दारू असल्याची माहिती वाहतूक पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी ही गाडी दाणोली-बांदा मार्गावरील बावळट तिठा येथे आली असता थांबविली व तपासणी केली. त्यात गोवा बनावटीची अवैध दारू असल्याचे आढळून आले. यामध्ये १९ बॉक्स रियल व्हिस्की, तीन बॉक्स बॅग पायपर, पाच बॉक्स मॅगडॉल, अशी मिळून एक लाख रुपये किमतीची दारू असून, पोलिसांनी स्कॉर्पिओ कारसह ही दारू जप्त केली. जप्त केलेल्या कारसह तब्बल आठ लाखांचा मुद्देमाल पोलिसांना आढळून आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून, पंचनामा करून हा गुन्हा आंबोली पोलिसांकडे वर्ग केला आहे. आंबोलीचे पोलीस हेडकॉन्स्टेबल गजेंद्र भिसे यांनी या तिन्ही आरोपींना उशिरा येथील न्यायालयात हजर केले. याबाबतची तक्रार वाहतूक पोलीस राजा राणे यांनी पोलिसांत दिली आहे. (प्रतिनिधी)