शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown : बेकायदेशीर दारू वाहतुकीचे सत्र सुरूच, बांदा पोलिसांकडून दोन ठिकाणी कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 14:33 IST

बांदा : बांदा पोलिसांनी शुक्रवारी दोन वेगवेगळ्या कारवाईत दारूसह मुद्देमाल जप्त केला. शुक्रवारी रात्री उशिरा बांदा सटमटवाडी नाका येथे ...

ठळक मुद्देबांदा पोलिसांकडून दोन ठिकाणी कारवाईदारूसह ५0 लाखांवर मुद्देमाल जप्त

बांदा : बांदा पोलिसांनी शुक्रवारी दोन वेगवेगळ्या कारवाईत दारूसह मुद्देमाल जप्त केला. शुक्रवारी रात्री उशिरा बांदा सटमटवाडी नाका येथे गोवा बनावटीच्या दारूसह ५० लाख ८८ हजार ३७४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.अत्यावश्यक सेवेच्या परवान्याचा गैरवापर करून बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक करण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत. अशा वाहनांतून गोवा बनावटीच्या दारुची अवैध वाहतूक करण्याचा प्रयत्न होत असल्याने बांदा तपासणी नाक्यावर बांदा पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व वाहनांची कसून तपासणी सुरू केली जात आहे. यामुळे चोरटी दारू वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.दुसऱ्या कारवाईत ७६ हजार ३७४ रुपयांची दारू व २० लाख रुपयांचा ट्रक असा एकूण २० लाख ७६ हजार ३७४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी सागर चंद्रकांत कदम (२५, चिंचोली-सातारा) व विजय पंढरीनाथ बरगे (३१, रा. कोरेगाव, सातारा) यांना अटक केली. या कारवाईत २० लाख रुपयांचा ट्रक (एम. एच. ११, ए. एल. ४३३६) जप्त करण्यात आला.ही कारवाई शुक्रवारी रात्री ११.५० वाजण्याच्या सुमारास चेकपोस्टवर करण्यात आली. ही कारवाई पोलीस निरीक्षक अण्णासाहेब बाबर, पोलीस उपनिरीक्षक हनुमंत देसाई, डी. डी. मिठबांवकर, डी. जी. गोळे यांच्या पथकाने केली. गोव्यात बार बंद असतानाही अत्यावश्यक सेवा परवाना वाहनधारकांना दारू कशी उपलब्ध होते असा सवाल होत आहे.दारू वाहतूकप्रकरणी गुन्हा दाखलपहिल्या कारवाईत बेकायदा दारू वाहतूक प्रकरणी केशव बबन मोरे (२६, रा. शिरूरकासार, जि. बीड) याच्यावर गुन्हा दाखल केला. तो टँकरमधून (एम. एच. १०, सी. आर. ५१६१) १२ हजार रुपयांची दारू वाहतूक करीत होता. या कारवाईत एकूण ३० लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याबाबतची तक्रार पोलीस कॉन्स्टेबल धनंजय गोळे यांनी दिली आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक अण्णासाहेब बाबर, डी. डी. मिठबांवकर, एच. एन. देसाई, धनंजय गोळे यांच्या पथकाने शुक्रवारी रात्री केली. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याliquor banदारूबंदीsindhudurgसिंधुदुर्ग