शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदा दारू वाहतूक करणारी कार पकडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 16:32 IST

गोवा बनावटीच्या दारुची अनधिकृतपणे वाहतूक करणाऱ्या कारचा राज्य उत्पादन शुल्क विभागाने थरारक पाठलाग केला. मात्र कारचा वेग जास्त असल्याने या कार चालकाने एका शिक्षकाच्या दुचाकीला धडक दिली.

ठळक मुद्देबेकायदा दारू वाहतूक करणारी कार पकडली सावंतवाडी न्यायालयात हजर

सावंतवाडी : गोवा बनावटीच्या दारुची अनधिकृतपणे वाहतूक करणाऱ्या कारचा राज्य उत्पादन शुल्क विभागाने थरारक पाठलाग केला. मात्र कारचा वेग जास्त असल्याने या कार चालकाने एका शिक्षकाच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत निवृत्त शिक्षक गंभीर जखमी झाले असून, उत्पादन शुल्क विभागाने मात्र कारचालक गणपत प्रभाकर माईणकर याला ताब्यात घेतले आहे. ही घटना मळेवाड कोंडुरे येथे घडली.उत्पादन शुल्क विभागाला गोवा बनावटीची दारू गोव्यातून येणार अशी माहिती मिळाली होती. त्यामुळे सातार्डा येथे सापळा रचला होता. त्याप्रमाणे एक कार सातार्डामार्गे मळेवाड कोंडुरेच्या दिशेने जाण्यासाठी आली असता त्या कारचा पाठलाग उत्पादन शुल्क विभागाने केला. त्यावेळी या कारचा चालक गणपत माईणकर याने गाडीचा वेग वाढविला.

त्याचवेळी कारची धडक आरोस पंचक्रोशी विद्याविकास हायस्कूल कोंडुरेचे माजी मुख्याध्यापक विठ्ठल येजरे यांच्या दुचाकीला बसली. या अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारार्थ मळेवाड प्राथमिक उपचार केंद्रात दाखल केले आहे. त्यानंतर उत्पादन शुल्क विभागाने अपघातानंतर ही कार चालकासह ताब्यात घेतली.

या कारमध्ये अनधिकृत दारूचे २५ खोके मिळून सुमारे ९६ हजार रुपयांची दारू व गाडी मिळून १ लाख ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. आरोपी माईणकर याला अटक केल्यानंतर येथील सावंतवाडी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती विभागाचे निरीक्षक सत्यवान भगत यांनी दिली. या कारवाईत भगत यांच्यासह पोलीस साळुंखे यांनी सहभाग घेतला. सातार्डा पोलीस चौकीवर माईणकर याची गाडी रोखण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला.

टॅग्स :liquor banदारूबंदीsindhudurgसिंधुदुर्ग