शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

कणकवलीतील नाल्यांच्या कामांकडे दुर्लक्ष, नागरिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 12:38 IST

कणकवली शहरात महामार्ग चौपदरीकरणाचे काम जोरात सुरू आहे. मात्र, हे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीकडून गटारे, नाले यांची कामे व्यवस्थितरित्या न केल्याने अनेक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. अजूनही मोठा पाऊस झालेला नाही. मात्र, गेल्या चार पाच दिवसांत झालेल्या पावसाने अनेक ठिकाणी पाणी तुंबण्याच्या घटना घडल्या आहेत.

ठळक मुद्देकणकवलीतील नाल्यांच्या कामांकडे दुर्लक्ष, नागरिक त्रस्त महामार्ग ठेकेदार कंपनीकडून कामात दिरंगाई, दखल घेऊन कामे पूर्ण करण्याची मागणी

कणकवली : कणकवली शहरात महामार्ग चौपदरीकरणाचे काम जोरात सुरू आहे. मात्र, हे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीकडून गटारे, नाले यांची कामे व्यवस्थितरित्या न केल्याने अनेक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. अजूनही मोठा पाऊस झालेला नाही. मात्र, गेल्या चार पाच दिवसांत झालेल्या पावसाने अनेक ठिकाणी पाणी तुंबण्याच्या घटना घडल्या आहेत.सोमवारी दुपारी शहरात झालेल्या पावसाने स्टेट बँकेसमोरील विलास कोरगावकर यांच्या हॉटेलच्या परिसरात मोठ्या प्रमाणात चिखलयुक्त पाणी साचले होते. त्यामुळे ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांना पाचारण करून त्याबाबत माहिती दिल्यानंतर त्यांनी त्या पाण्याचा निचरा होण्यासाठी कार्यवाही केली आहे. पण त्यांनंतर जोराचा पाऊस न आल्याने तेथील काम योग्यप्रकारे झाले आहे की नाही हे समजू शकलेले नाही.अशी स्थिती कणकवली शहरात अनेक ठिकाणी आहे. त्यामुळे मोठ्या पावसापूर्वी ठेकेदार कंपनीने त्याची दखल घेऊन ती कामे पूर्ण करावीत अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. नगरपंचायत प्रशासन तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने यासमस्येकडे त्वरित लक्ष न दिल्यास गतवर्षीप्रमाणे नागरिकांच्या दुकानात, घरात पाणी घुसण्याची शक्यता आहे.महामार्ग चौपदरीकरणाअंतर्गत उभारण्यात येणाऱ्या उड्डाण पुलाच्या शेजारी सर्व्हिस रस्ते बांधण्यात आले आहेत. या रस्त्यांच्या शेजारी काही अंतर सोडून गटारे बांधण्यात आली आहेत. पावसाचे पाणी या गटारात न जाता सर्व्हिस रस्त्यावरच साचत असल्याने पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालताना त्रास सहन करावा लागत आहे. वाहने या रस्त्यावरून गेल्यावर चिखलयुक्त पाणी पादचाऱ्यांच्या अंगावर उडत आहे.यासमस्येकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणीही नागरिकांकडून करण्यात येत आहे. कणकवली प्रांताधिकारी कार्यालयापासून जवळच असलेल्या रेवडेकर बिल्डिंगशेजारी असलेल्या नाल्याचे काम अर्धवट स्थितीत असून जोरदार पाऊस आल्यास तेथील आस्थापनांमध्ये पाणी घुसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

टॅग्स :highwayमहामार्गsindhudurgसिंधुदुर्ग