शहरं
Join us  
Trending Stories
1
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
2
दिवाळीपूर्वी मोठी भेट! कपडे, खाद्यपदार्थांवरील GST ५% होणार? 'या' वस्तू आणि सेवांवरील टॅक्सही घटणार
3
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
4
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
5
वाह! आयुष्य असावं तर 'या' क्रिकेटरसारखं...; ६ महिने आराम अन् पगार मिळतो २७ कोटी
6
तंत्रज्ञानाची किमया! इंटरनेटशिवाय WhatsApp कॉल; गुगलचा आश्चर्याचा धक्का, काय आहे प्लॅन?
7
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
8
अर्जुन-सानिया यांच्या साखरपुड्यासंदर्भातील फिरकी घेणारा प्रश्न अन् सचिन तेंडुलकरचा 'स्ट्रेट ड्राइव्ह'
9
उकडीचे की तळणीचे मोदक? वाद मोठा जहाल, पण दोन्ही मोदक आरोग्याच्या हिताचे; वाचा फायदे
10
मेड इन इंडिया! मारुतीची पहिली इलेक्ट्रिक कार अखेर लॉन्च, परदेशातही निर्यात होणार
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
12
गणेश चतुर्थी २०२५: गुरुजींना उशीर झाला? रेकॉर्डेट कंटेट नको? स्वतःच करा गणपती प्राणप्रतिष्ठा
13
चीनमध्ये शक्तीप्रदर्शन; मोदी, पुतिन आणि जिनपिंग एकाच व्यासपीठावर, अमेरिकेला लागणार मिरची
14
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
15
पैसै घेऊन मूर्तीकार पळाला, कारखाना जैसे थे ठेवला; ऐनवेळी मूर्ती कुठून आणायची, गणेशभक्तांना चिंता
16
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
17
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
18
कॅनरा बँकेला ११७ कोटींचा गंडा; अमित थेपाडेला अटक, ईडीची दक्षिण मुंबईतील हॉटेलमध्ये कारवाई
19
मेड इन इंडिया 'ई-विटारा'ची १०० देशांमध्ये होणार निर्यात; पंतप्रधान मोदी म्हणाले, "भारताच्या आत्मनिर्भर आणि..."
20
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?

आदर्श प्रतिष्ठानचे ‘आदर्श पाऊल’

By admin | Updated: August 31, 2015 21:07 IST

आधार : भालावल येथील महिलेला १५ दिवसांत दिले हक्काचे घर; २०१० साली अतिवृष्टीने घर जमिनदोस्त

महेश चव्हाण -ओटवणे  -भटक्या जमातीसाठी शासन जागा खरेदी करून घरे बांधून देते. मग निवासितांना बेघर का व्हावे लागते? अशा दु:खाने ग्रासलेल्या भालावल-लोहारवाडी येथील सुवासिनी लक्ष्मण गुळेकर यांना त्यांच्या हक्काचे घर १५ दिवसात उभे करून देत माजगाव येथील आदर्श प्रतिष्ठान संस्थेने समाजप्रणित आदर्शवादी पाऊल टाकले आहे.गेली पाच वर्षे बेघर होऊन खितपत पडलेल्या या गरीब कुटुंबाला आदर्श प्रतिष्ठानने मदतीचा आधार देत स्ट्रक्टरची जवळजवळ ८० हजारांची निवासी रोड उभी करू न दिली. आदर्श प्रतिष्ठानचे अध्यक्ष चंद्रकांत कासार यांनी सुवासिनी गुळेकर यांना घराची किल्ली सुपूर्द केली आणि दोन चिमण्या पाखरासह आईला हक्काचे सुरक्षित घरटे मिळाले आहे.जुलै २०१० मध्ये अतिवृष्टीने लक्ष्मण गुळेकर यांचे मातीचे घर जमीनदोस्त झाले. पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्याकडून केवळ आश्वासने व तुटपुंजी मदत मिळाली. त्यामुळे गुळेकर कुटुंबाने काही पैशांची जुळवाजुळव करून उभ्या केलल्या खोपटीत संसार सावरण्याचा प्रयत्न केला. पण दुसऱ्या वर्षीच घरातील कर्ता लक्ष्मण गुळेकर यांचे निधन झाल्याने सुवासिनी गुळेकर यांच्यावर आभाळ कोसळले. मांडलेला संसार जुळतो न जुळतो तोच पुन्हा विस्कटला. अन्न, वस्त्र, निवारा त्याचबरोबर दोन चिमुकल्या जिवांचे शिक्षण समोर असल्याने त्यांच्यासमोर आव्हान उभे ठाकले होते. माणसासाठी सर्वाधिक महत्त्वाची आवश्यक गोष्ट म्हणजे डोक्यावर हक्काचे छप्पर. त्यानुसार शासनाकडे पायपीट झाली. बेघर असल्याचा दाखलाही मिळाला. पण जमिनीचा वाद आणि तांत्रिक अडचणी समोर आल्याने, शासनानेही उदासिनता दाखवल्यामुळे घराचे स्वप्न अधुरेच होते. या गरीब, असहाय्य महिलेली दु:ख गाथा आदर्श प्रतिष्ठनच्या कानी पडली आणि त्यांनी तत्काळ १५ आॅगस्ट रोजी पाहणी करत या महिलेला हक्काचे घर मिळवून देण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले. भालावलचे रहिवासी संजय गुळेकर यांनी याबाबत आदर्श प्रतिष्ठानकडे पाठपुरावा केला. त्यानुसार प्रतिष्ठानचे अध्यक्ष चंद्रकांत कासार आणि सहकाऱ्यांनी प्रथमदर्शनी शासन योजनेतून घरकूल निर्माण होण्यासाठी प्रयत्न केले; पण शासकीय निकष, सामाईक जमिनीचे वाद यामुळे अडचणी निर्माण झाल्या.अखेर शासनाकडे गुडघे न टेकता आदर्श प्रतिष्ठानने स्वत: रकमेचा भार उचलित जवळजवळ ८० हजारांची निवासी स्ट्रक्चर शेड या गरीब कुटुंबाला १५ दिवसांत उभी करून दिली. प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष संदेश सावंत, मिलिंद पित्रे, विजय सावंत, यशवंत आयरे, बाळू वाळके, दत्तगुरू बोगवे, प्रकाश कांबळी, रूपेश नाटेकर, सोनू दळवी, पे्रमलता परब, अमित तावडे, रमेश साळगावकर, उपसरपंच समीर परब, आनंद दळवी, अनंत मेस्त्री आदी सर्वांनी मदतीचा हात पुढे केला. ओटवणे येथील अमित तावडे यांनीविनामोबदला शेड उभारून दिली आणि गुळेकर कुटुुंबाला हक्काचे घर मिळाले.शिक्षणाची जबाबदारीकेवळ घरकुल देऊन न थांबता, या गरीब महिलेच्या दोन्ही मुलांच्या शिक्षणाचीही जबाबदारी संस्थेने उचलली आहे. कास येथील रामचंद्र दामोदर कुडके गुरूजींनी बांदा महाविद्यालयात अकरावीत शिक्षण घेत असलेल्या दत्ताराम गुळेकर याच्या शिक्षणाची जबाबदारीही स्वीकारली आहे.बेघर यादीत नाव समाविष्ट असूनही व घरकुल मंजूर होऊनसुद्धा सामाईक जमीन व अन्य काही तांत्रिक कारणांमुळे घरकुल उभे राहू शकले नाही. पण, सुवासिनी गुळेकर यांना स्थानिक पातळीवर वेळोवेळी संस्थेकडून आर्थिक सहकार्य दिले जाईल.- समीर परब, उपसरपंच, भालावल