शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

गरज पडल्यास सिल्व्हर ओक वर जाऊन माफी मागेन; दिपक केसरकर नरमले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2022 05:28 IST

राणेंवरही बोलणार नसल्याचे केले स्पष्ट 

अनंत जाधव "राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे माझ्या गुरु समान आहेत. त्यामुळे काही झाले तरी त्यांच्यावर मी बोलणार नाही. त्यामुळे तसा कोणाचा गैरसमज झाला असेल तर मी कधीही त्यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाऊन माफी मागण्यास कधीही तयार आहे. त्यात मला कमीपणा वाटणार नाही," असे म्हणत दीपक केसरकर यांनी पवार यांची दिलगिरी व्यक्त केली. तर यापुढे केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर पण बोलणार नसल्याचे केसरकर यांनी जाहीर केले. ते शुक्रवारी रात्री उशिरा आयोजित पत्रकार परिषदेत सावंतवाडीत बोलत होते. याच वेळी त्यांनी आता माघार नाही म्हणत उद्धव ठाकरे यांना दिलेला अल्टीमेटम संपला असल्याचे सांगितले. 

"शरद पवार यांच्यावर मी जे बोललो ती राजकीय वस्तुस्थिती होती. मात्र कोणत्याही पद्धतीने मी त्यांच्यावर टीका केली नाही, असे असताना काहींनी माझ्या बोलण्याचा विपर्यास केला. तरीही कोणाचे मन दुखावले असेल तर मी त्यांच्या निवासस्थानी जाऊन माफी मागण्यास तयार आहे," असे केसरकर यांनी स्पष्ट केले.

युतीचा धर्म पाळून उद्धव ठाकरे यांनी आमच्या सोबत यावे यासाठी प्रयत्न सुरू होते. वारंवार आम्ही त्यासाठी पुढाकार घेतला. परंतु आता वेळ संपत आली आहे. आता मातोश्रीवर परत जाणे शक्य नसल्याचे म्हणत दिलेला अल्टीमेटम संपल्याचे त्यांनी जाहीर केले. तसेच भाजप नेते नारायण राणे यांच्यावर मी कधीही व्यक्तिगत बोललो नाही. त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर बोलणे टाळावे, असे आमचे म्हणणे होते. तर दुसरीकडे त्यांची मुले माझ्यापेक्षा लहान आहे, त्यामुळे मी त्यांना लहान म्हटले होते. परंतु तसे म्हणण्याचा त्यांना राग येत असेल तर यापुढे मी कुणावरही बोलणार नाही. जे कोणी माझ्या जिल्ह्यातील स्थानिक नेते टीका करत आहेत त्यांना मी उत्तर देणार नाही, असेही दिपक केसरकर यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर Sharad Pawarशरद पवारMaharashtraमहाराष्ट्रNarayan Raneनारायण राणे