शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Vidhan Sabha 2019 : शिवसेनेसोबतचे वैर संपणार? पहा, काय म्हणाले राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 13:57 IST

मी नम्रच आहे, शिवसेनेने त्याचा बोध घ्यावा.असे सांगून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेतील कटुता संपवण्याबाबत केलेल्या आव्हानाला प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत नारायण राणे आणि शिवसेना यांच्यात सुरू असलेले वैर संपणार काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ठळक मुद्देमी नम्रच आहे, शिवसेनेने त्याचा बोध घ्यावा : नारायण राणे जिल्ह्यात तिन्ही भाजपाच्या उमेदवारांचा विजय

कुडाळ : मी नम्रच आहे, शिवसेनेने त्याचा बोध घ्यावा.असे सांगून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेतील कटुता संपवण्याबाबत केलेल्या आव्हानाला प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत नारायण राणे आणि शिवसेना यांच्यात सुरू असलेले वैर संपणार काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

कुडाळ येथे प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी राणे त्याठिकाणी आले होते. यावेळी उपस्थित पत्रकारांनी शुक्रवारी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्याबाबत त्यांना छेडले असता, त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. मी नम्र आहे शिवसेनेने त्याचा बोध घ्यावा,असे त्यांनी म्हटले आहे.मालवण विधानसभा मतदारसंघाचे भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार रणजित देसाई यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन राणे यांच्या हस्ते झाले.यावेळी जिल्हा बँक संचालक अतुल काळसेकर,महाराष्ट्र स्वाभिमान महिला जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे,तालुकाध्यक्ष विनायक राणे, भाजपाचे तालुकाध्यक्ष चारुदत्त देसाई तसेच इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी पत्रकारांशी बोलताना राणे यांनी सांगितले की या जिल्ह्यात तिन्ही उमेदवार भाजपचे असून भाजपचा विजय निश्चित होणार आहे. याठिकाणी देसाई यांनाही सुमारे तीस हजारच्या वर मताधिक्य मिळणार आहे.आमदार वैभव नाईक हे योगायोगाने आमदार झाले आहेत. त्यांनी आता आमचे अपक्ष उमेदवार रणजित देसाई यांच्या समोर विजय होऊन दाखवावे. मग जर नारायण राणे यांचे नाव द्यावे असा सल्लावजा टोला त्यांनी आमदार नाईक यांना लगावला.

शिवसेना व राणे यांचे संबंध सुधारावेत या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, मी शिवसेनेवर टीका करीत नाही. मी नम्र आहे. मात्र शिवसेनेने बोध घ्यावा, असा सल्ला शिवसेनेला दिला. तसेच आज शिवसेनेकडे उमेदवार नाही त्यामुळे त्यांना आयात उमेदवार आणावे लागले. मात्र आमच्याकडे उमेदवारांची संख्या मोठी आहे, असा टोलाही त्यांनी शिवसेनेला लगावला.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Shiv Senaशिवसेनाsindhudurgसिंधुदुर्ग