शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
2
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
3
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
4
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
5
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
6
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
7
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
8
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
9
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
10
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
11
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
12
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
13
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
14
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
15
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
16
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
17
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
18
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
19
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
20
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी

ढगफुटीमुळे तिलारी घाटात डोंगर कोसळला, यंत्रणेचा बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 16:41 IST

तिलारी घाटात झालेल्या ढगफुटीमुळे भूस्खलन होऊन तब्बल दोन ठिकाणी डोंगर कोसळला. या दोन्ही ठिकाणच्या दरडींमध्ये वृत्तांकन करण्यासाठी गेलेले पत्रकार तुळशीदास नाईक व विजघर येथे वीजनिर्मिती केंद्रावर कामासाठी जाणारे कामगार अडकून पडले. याबाबतची माहिती दोडामार्ग व कोल्हापूर या दोन्ही ठिकाणच्या आपत्ती व्यवस्थापनाला देण्यात आली. तरीही सायंकाळी उशिरापर्यंत आपत्ती यंत्रणा घटनास्थळी पोहोचली नव्हती. अखेर ग्रामस्थांनी सात तासांच्या अथक प्रयत्नांनंतर लाकडी ओंडक्याच्या सहाय्याने घाटात अडकलेल्यांना बाहेर काढले.

ठळक मुद्देवीजघर येथे कामासाठी गेलेले कामगार अडकून पडलेग्रामस्थांचे शर्थीचे प्रयत्न; सात तासांनंतर अडकलेले सुखरुप

दोडामार्ग : तिलारी घाटात झालेल्या ढगफुटीमुळे भूस्खलन होऊन तब्बल दोन ठिकाणी डोंगर कोसळला. या दोन्ही ठिकाणच्या दरडींमध्ये वृत्तांकन करण्यासाठी गेलेले पत्रकार तुळशीदास नाईक व विजघर येथे वीजनिर्मिती केंद्रावर कामासाठी जाणारे कामगार अडकून पडले. याबाबतची माहिती दोडामार्ग व कोल्हापूर या दोन्ही ठिकाणच्या आपत्ती व्यवस्थापनाला देण्यात आली. तरीही सायंकाळी उशिरापर्यंत आपत्ती यंत्रणा घटनास्थळी पोहोचली नव्हती. अखेर ग्रामस्थांनी सात तासांच्या अथक प्रयत्नांनंतर लाकडी ओंडक्याच्या सहाय्याने घाटात अडकलेल्यांना बाहेर काढले.या ढगफुटीचा फटका तिलारी खोऱ्यातील गावांनाही बसला. हेवाळे गावाला पुराच्या पाण्याने वेढा दिला होता. बागायतदारांचेही मोठे नुकसान झाले.तिलारी घाट परिसरात शुक्रवारी ढगफुटी झाली. त्यामुळे तिलारी घाट व परिसराला त्याचा चांगलाच फटका बसला. तिलारी घाटात भूस्खलन होऊन डोंगरच रस्त्यावर येण्याचा प्रकार घडला. याबाबतची माहिती पत्रकार तुळशीदास नाईक यांना समजताच ते तिलारी घाटात वृत्तांकन करण्यासाठी दाखल झाले. याच दरम्यान तिलारीनगर येथून विजघर येथील वीजनिर्मिती केंद्रावर येणारे कामगार रमेश घाडी व प्रकाश पाटील हे देखील घाटात आले. मात्र, दरड कोसळल्याने ते घाटात अडकले.परतीचा प्रवास करावा म्हणून घाटात अडकलेले तिघेही मागे फिरले असता आणखीनच एक दरड परतीच्या मार्गावर कोसळली. यावेळी ही दरड कोसळताना तिघेही केवळ दैव बलवत्तर म्हणून बचावले. येण्या-जाण्याचे दोन्ही मार्ग बंद झाल्याने हे तिघेही घाटातच अडकून पडले. याबाबतची माहिती त्यांनी दोडामार्ग तहसील व कोल्हापूर जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दिली. मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत आपत्ती व्यवस्थापन त्या ठिकाणी पोहोचले नव्हते.

अखेर सात तासांच्या संघर्षानंतर लाकडी ओंडक्याच्या सहाय्याने अडकलेल्या तिघांसह दोन दुचाकी ग्रामस्थांनी बाहेर काढल्या. गेल्या महिनाभरात तिलारी घाट कोसळण्याची ही दुसरी घटना घडली. महिनाभरापूर्वी घाट कोसळला होता. त्यानंतर भूस्खलन होऊन पुन्हा एकदा डोंगर खचून रस्त्यावर येण्याची घटना शुक्रवारी घडली.आपत्ती व्यवस्थापनाचे तीन तेरादोडामार्ग तहसील कार्यालयातील आपत्ती निवारण कक्षाला याबाबतची माहिती शुक्रवारी सकाळीच देण्यात आली. मात्र, तेथील एकाही अधिकाºयाने ही गोष्ट गांभीर्याने घेतली नाही. कोल्हापूर जिल्ह्यातील आपत्ती विभागानेही याकडे दुर्लक्ष केले. मिळालेल्या माहितीनुसार सायंकाळी उशिरापर्यंत दोडामार्गचा आपत्ती विभाग जेसीबीचा शोध घेत होता. तिलारी खोऱ्याला पुराचा वेढातिलारी घाट व परिसरात झालेल्या ढगफुटीमुळे तिलारी खोऱ्याला पुराचा वेढा पडला. तिलारी नदी, मूळस-हेवाळे नदी, तसेच इतर नद्यानाल्यांना पूर आला. त्यामुळे त्याचा फटका हेवाळे, घोटगेवाडी, विजघर आदी गावांना बसला. पुराच्या पाण्याने या गावांना वेढा दिला. तसेच बागायतीमध्ये पाणी शिरल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. 

टॅग्स :Tilari damतिलारि धरणsindhudurgसिंधुदुर्ग