शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
4
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
6
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
7
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
8
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
9
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
10
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
11
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
12
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
13
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
14
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
15
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
16
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
17
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
18
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
19
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
20
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा

मंत्री दीपक केसरकरांची ऑफर, सावंतवाडीचे शिवसेना तालुकाप्रमुख म्हणाले...

By अनंत खं.जाधव | Updated: August 16, 2022 17:47 IST

पर्यटन निधीतून उभारण्यात आलेल्या विविध प्रकल्पात मोठा आर्थिक अपहार

सावंतवाडी : मी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत नेहमीच एकनिष्ठ राहिलो असून भविष्यात ही राहणार आहे. काल   माझ्या गावातील नेमळे ग्रामसचिवालयाच्या उद्घाटनाला मंत्री दिपक केसरकर यांनी जो काही संभ्रम निर्माण केला त्यामुळे मला काही फरक पडणार नाही. कारण एकनिष्ठेची किंमत गद्दारांना काय कळणार त्यांना जळीस्थळी राजकारणच दिसणार अशी जोरदार टिका शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी केली.काल, सोमवारी नेमळे येथील ग्रामसचिवालय उद्घाटन कार्यक्रमात मंत्री केसरकर यांनी शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांना उद्देशून जास्त उशीर करु नका लवकर आमच्याकडे या अशी ऑफर दिली होती. या पार्श्वभूमीवर राऊळ यांनी आज, मंगळवारी आपली भूमिका मांडत केसरकर यांनी जनतेचा विश्वासघात केल्याचा आरोप केला आहे.राऊळ म्हणाले, आपण केसरकरांसोबत साडेसात वर्ष काम केले. त्याना मी जवळून ओळखतो. ते दगड एकीकडे मारतात पण निशाणा  दुसरीकडे असतो, नेमकं कालच्या त्याच्या वाक्यात निशाणा दुसरीकडे होता. तेथे असलेल्या अन्य भाजपच्या नेत्यांना उद्देशून त्यांनी ही गुगली टाकली आहे.

निमंत्रण असल्याने तिथे गेलोमात्र त्यांनी माझ्याबाबत केलेल्या वाक्याचा विपर्यास कोणीही करून घेऊ नये. कारण काल, आज, उद्या मी शिवसेनेसोबत आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबतच एकनिष्ठ आहे आणि राहणार. केवळ माझ्या गावच्या ग्रामसचिवालयाचे उद्घाटन असल्याने आणि निमंत्रण असल्याने आपण तिथे गेलो. त्यामागे अन्य काहीही कारण नाही असे त्यांनी सांगितले.पर्यटन निधीतून उभारण्यात आलेल्या विविध प्रकल्पात मोठा आर्थिक अपहारकेसरकर यांच्या मागच्या काळात झालेल्या चांदा ते बांदा या योजनेसह आंबोलीत पर्यटन निधीतून उभारण्यात आलेल्या विविध प्रकल्पात मोठा आर्थिक अपहार झाला आहे. तो आम्ही लवकरच पुराव्यानिशी उघड करू, असा इशारा ही राऊळ यांनी दिला. केसरकर यांना मतदारांचा त्यांना विसर पडला आहे. कालच्या दौर्‍यात त्यांनी मल्टीस्पेशालिटी तसेच अन्य प्रश्नावर भाष्य केले नाही, यातूनच जनते बद्दल असलेले प्रेम दिसून येते असेही राऊळ म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गDipak Kesarkarदीपक केसरकरShiv Senaशिवसेना