शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

आदित्य ठाकरेंनी कोकणसाठी किती निधी दिला?, नितेश राणेंचा सवाल 

By सुधीर राणे | Updated: September 26, 2023 11:48 IST

कणकवली: सिंधुदुर्ग , रत्नागिरी, रायगडमध्ये येऊन पर्यटनाला चालना देण्यासाठी वेगळी ताकद लागते. मात्र, फुकटच्या बडबडण्याला कोकणची जनता महत्त्व देत ...

कणकवली: सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडमध्ये येऊन पर्यटनाला चालना देण्यासाठी वेगळी ताकद लागते. मात्र, फुकटच्या बडबडण्याला कोकणची जनता महत्त्व देत नाही. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी सत्ता असताना कोकणसाठी किती निधी दिला ते प्रथम सांगावे? असा टोला भाजप आमदार नितेश राणे यांनी लगावला. कणकवली येथे आमदार नितेश राणे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, आदित्य ठाकरे यांचे वडील जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी विधिमंडळामध्ये जाहीर केले होते की कोकणामध्ये जे नियमित कर्ज भरतात त्या प्रत्येकाला ५० हजार रुपयांचे कर्ज दिले जाईल. पण त्यांच्या अडीच वर्षांच्या कारकीर्दीमध्ये ते पन्नास हजार सोडाच पण एक दमडी पण भेटलेली नाही. सिंधुदुर्ग किल्ल्यावर असलेल्या शिव मंदिराला ५० लाख रुपये स्वतः पदरमोड करून देणार असेही उद्धव ठाकरे यांनी घोषित केले होते. मग आदित्य ठाकरेंनी त्यांच्या वडिलांनी जाहीर केलेल्या पैकी एक तरी काम पूर्ण केले आहे काय? याबाबत जनतेला सांगावे.शिंदे आणि फडणवीस सरकारने ठाकरेंनी जाहीर केलेले ५० हजार रुपये शेतकऱ्यांना दिले. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी वायफळ बडबड करण्यापेक्षा व पर्यटकांसारखे इथे येण्यापेक्षा त्यांचे वडिल अडीच वर्षांमध्ये सरकारमध्ये असताना तसेच ते स्वतः पर्यटन मंत्री असताना किती वेळा कोकणात आले ते सांगावे. गोव्यामध्ये येऊन फाईव्ह स्टारमध्ये नाईट लाईफ करणे सोपे आहे. पण सिंधुदुर्गसह कोकणात येऊन पर्यटन वाढीसाठी प्रयत्न करणे फार कठीण आहे. या कोकणात वादळ आले तेव्हा एक दमडी पण ठाकरे सरकारने दिली नाही. निसर्ग वादळाच्या वेळी ७५ लाख सिंधुदुर्गाला मिळणार होते. त्याचे काय झाले? एक रुपया देखील मिळालेला  नाही. त्यामुळे  पुढच्या वेळी आदित्य ठाकरे सिंधुदुर्गात आले तर त्यांनी  खुल्या व्यासपीठावर यावे. मी पण त्यावेळी येईन. आपण कोकणाच्या विकासावर चर्चा कर. कोकणच्या जनतेला सत्य काय आहे ते समजूदेत असेही नितेश राणे यावेळी म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNitesh Raneनीतेश राणे Aditya Thackreyआदित्य ठाकरे