शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: सासोलीत बेसुमार वृक्षतोड करून २० लाख दंड कसा?, संदेश पारकर यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2024 12:13 IST

काही झाले तरी आता माघार नाही

सावंतवाडी : दोडामार्ग तालुक्यातील सासोली येथे बेसुमार वृक्षतोड झाली आहे. लोकांच्या तक्रारी असूनही वनखात्याने वृक्षतोडीचा परस्पर सर्व्हे केला. सर्वेक्षण करताना लोकांना सोबत घ्यायला हवे होते; तसे केले नाही. त्यामुळे पुनश्च सर्वेक्षण करून वृक्षतोड करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा. दंड करून भागणार नाही, असा इशारा उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी दिला. उद्धवसेना याविरोधात जोरदार आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.उपवनसंरक्षक कार्यालयात सहायक वनसंरक्षक वैभव बोराटे, वनक्षेत्रपाल संजय कुंभार यांना सासोली येथील सामायिक जमिनीतील बेसुमार वृक्षतोडीवरून पारकर यांनी सहायक वनसंरक्षक यांना चांगलेच धारेवर धरले.सहा हजार झाडे तोडण्यात आली असून, त्यासाठी वीस लाख रुपये दंड केला आहे. तो दंड कमी आहे. हा दंडही जमा केलेला नसल्याने या जमिनीच्या सातबारावर वनविभागाचे नाव नोंद करण्याबाबत आम्ही महसूल विभागाला कळविले असल्याचे बोराटे यांनी संदेश पारकर यांना सांगितले.यावर पारकर म्हणाले, दोडामार्ग तालुका इकोसेन्सिटिव्ह झोनअंतर्गत आहे. तसेच मुंबई उच्च न्यायालयात व्याघ्र कॉरिडॉरअंतर्गत नोंद असल्याने वृक्षतोडीवर बंदी असताना या ठिकाणी बेसुमार वृक्षतोड करूनही वनखाते फक्त दंडात्मक कारवाईचीच पावले उचलत आहे. उलट संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला पाहिजे, अशी आमची मागणी आहे. सामायिक जमिनीत संबंधिताची जमीन नेमकी कुठे आहे हे अजून निश्चित झाले नाही. या जमिनीचा सातबारा, आकारफोड पत्र, बोटखतात सामायिक जमीन अशी कागदपत्रे आहेत. त्यामुळे वन खात्याने सातबारावर बोजा चढवण्याची महसूलकडे केलेली मागणी बेकायदेशीर आहे. हे आपल्याला चुकीचे वाटते, असे ते यावेळी म्हणाले. वनखात्याने बेसुमार वृक्षतोड करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही त्यांनी केली. यावेळी शहरप्रमुख शैलेश गवंडळकर, संघटक शब्बीर मणीयार उपस्थित होते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गSandesh Parkarसंदेश पारकर