शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

होळीच्या सणाला आवास योजनेतील घरांचा ताबा देणार : संजय घोगळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 19:55 IST

Home Sindhudurgnews- सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध ग्रामीण गृहनिर्माण योजनांमधील अद्यापपर्यंत ४०७१ घरकुले पूर्ण झाली असून मार्च २०२१ पर्यंत १९९९ घरकुले पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. विविध ग्रामीण गृहनिर्माण योजनांमधील लाभार्थ्यांना होळीच्या सणाला घरकुलांचा ताबा देण्याचा मानस महा आवास अभियान-ग्रामीण कोकण विभागाचे संपर्क अधिकारी संजय घोगळे यांनी दौऱ्यादरम्यान व्यक्त केला.

ठळक मुद्देहोळीच्या सणाला आवास योजनेतील घरांचा ताबा देणार : संजय घोगळेग्रामीण गृहनिर्माण योजना, महा आवास अभियानाची अंमलबजावणी सुरू

वेंगुर्ला : सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध ग्रामीण गृहनिर्माण योजनांमधील अद्यापपर्यंत ४०७१ घरकुले पूर्ण झाली असून मार्च २०२१ पर्यंत १९९९ घरकुले पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. विविध ग्रामीण गृहनिर्माण योजनांमधील लाभार्थ्यांना होळीच्या सणाला घरकुलांचा ताबा देण्याचा मानस महा आवास अभियान-ग्रामीण कोकण विभागाचे संपर्क अधिकारी संजय घोगळे यांनी दौऱ्यादरम्यान व्यक्त केला.राज्यात महा आवास अभियानाची अंमलबजावणी जोरदार सुरू असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अभियान अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी राज्य व्यवस्थापन कक्षामार्फत संपर्क अधिकारी संजय घोगळे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा केला.

यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा सिंधुदुर्गचे सहायक प्रकल्प अधिकारी जगदीश यादव, अधीक्षक विक्रांत गावडे, सहायक लेखा अधिकारी मनोज पिळणकर, जिल्हा प्रोग्रामर श्रद्धा गिरकर, कनिष्ठ सहायक ऋतुराज तळवणेकर, लिपिक कविता परब, डेटा एन्ट्री ऑपरेटर स्मिता मोजरकर आदी उपस्थित होते.या दौऱ्यामध्ये त्यांनी सावंतवाडी पंचायत समिती, वर्दे-कुडाळ, वेंगुर्ला-मातोंड, सावंतवाडी-इन्सुली येथील ग्रामपंचायत कार्यालये तसेच लाभार्थ्यांच्या घरकुलांना भेटी देऊन प्रगतीचा आढावा घेऊन समाधान व्यक्त केले.अभियानातील इतर उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीमध्ये भर देऊन लाभार्थ्यांना सर्व सुविधांनीयुक्त घरकुलांबरोबरच लाभार्थ्यांचे राहणीमान उंचावण्यावर भर देण्याच्या सूचना संजय घोगळे यांनी संबंधितांना दिल्या. तसेच घोगळे यांनी जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रकल्प संचालिका दीपाली पाटील यांच्याशी अभियानाच्या सकारात्मक प्रगतीबाबत चर्चा केली. 

टॅग्स :Homeघरsindhudurgसिंधुदुर्ग