शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

अंशकालीन स्त्री परिचर कर्मचाऱ्यांचे घंटानाद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 15:54 IST

महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा अंशकालीन स्त्री कर्मचारी संघटनेच्यावतीने विविध मागण्यांसाठी सोमवारी सकाळी घंटानाद आंदोलन छेडण्यात आले. त्यानंतर दुपारी १ ते सायंकाळी ५ या वेळेत हेच आंदोलन जिल्हा परिषद कार्यालयासमोर छेडण्यात आले.

ठळक मुद्देअंशकालीन स्त्री परिचर कर्मचाऱ्यांचे घंटानाद आंदोलनमुंबईत आझाद मैदान येथे उपोषण केले जाणार

ओरोस : महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा अंशकालीन स्त्री कर्मचारी संघटनेच्यावतीने विविध मागण्यांसाठी सोमवारी सकाळी घंटानाद आंदोलन छेडण्यात आले. त्यानंतर दुपारी १ ते सायंकाळी ५ या वेळेत हेच आंदोलन जिल्हा परिषद कार्यालयासमोर छेडण्यात आले.यावेळी अतिरिक्त महासचिव रावजी यादव, परिचर संघटना अध्यक्ष मनीषा परब, सचिव अर्चना महाले, जिल्हा संघटक शितल सावंत यांच्यासह असंख्य कर्मचारी उपस्थित होते.४० रुपयांत येते काय, चहा, नाष्टा काहीच नाय, सरकार खाते तुपाशी, आम्ही राहिलो उपाशी, एक रुपयाचा कढीपत्ता, सरकार झाले बेपत्ता, कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय जाणार नाही अशा घोषणा देण्यात आल्या.

विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटसमोर तसेच जिल्हा परिषद गेटसमोर महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी संघटनेने अतिरिक्त महासचिव रावजी यादव व अध्यक्षा उषा लाड यांच्या मार्गदर्शनाखाली घंटानाद आंदोलन केले. तर ३ जुलै रोजी आझाद मैदान, मुंंबई येथे बेमुदत उपोषण केले जाणार आहे, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाने ६ मे रोजी दिलेल्या निवेदनातील मागण्यांची कोणतीही कार्यवाही झालेली नसून फेब्रुवारी ते एप्रिल महिन्यांचे मानधन मिळालेले नाही. अनेकवेळा स्त्री परिचर यांना शासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे कोणताही लाभ मिळत नाही.

जिल्हा परिषद सेवेचा राजीनामा दिल्यानंतरही पुन्हा जिल्हा परिषद सेवेत दिलेल्या नियुक्तीची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, आरक्षण नसेल तर जाब मागायला कोणाकडे जावे, यापुढे आमची दखल न घेतल्यास आगामी होणाऱ्या शासन अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून मुंबईत आझाद मैदान येथे उपोषण केले जाणार आहे, असा इशारा रावजी यादव यांनी दिला.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीsindhudurgसिंधुदुर्ग