शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

गव्यांकडून बागायतींचे नुकसान, खर्च केलेले लाखो रुपये पाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 11:28 IST

लाखो रुपये खर्च करून तयार केलेल्या बागायतींचे रानटी प्राण्यांकडून नुकसान होत असल्याने पाडलोस-केणीवाडा येथील शेतकरी, बागायतदार मेटाकुटीस आले आहेत.

ठळक मुद्दे गव्यांकडून बागायतींचे नुकसान, खर्च केलेले लाखो रुपये पाण्यात पाडलोस-केणीवाडा येथील शेतकरी मेटाकुटीस

बांदा : लाखो रुपये खर्च करून तयार केलेल्या बागायतींचे रानटी प्राण्यांकडून नुकसान होत असल्याने पाडलोस-केणीवाडा येथील शेतकरी, बागायतदार मेटाकुटीस आले आहेत.

प्रेमानंद साळगावकर यांच्या बागेतील नारळ, सुपारी, काजू, जांभूळ व दालचिनी झाडे गव्यांनी जमीनदोस्त केली असून त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. गव्यांच्या लागलेल्या झुंजीमुळे झाडांची हानी झाल्याचे कामगार सुनील नाईक यांनी सांगितले.पाडलोस परिसरात गव्यांचा वावर नेहमीच असतो. गव्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. वनविभागाला लागणारी कागदपत्रे महसूलकडून वेळेवर मिळत नाहीत. तसेच सावंतवाडीला खेपा माराव्या लागत असल्याने शेतकरी नुकसानीच्या पंचनाम्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे केवळ पंचनामा न करता अशा उपद्रवी प्राण्यांचा प्रशासनाने कायमचा बंदोबस्त करून करावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.सद्यस्थितीत पाडलोसमधील शेकडो एकर जमीन गव्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे पडीक ठेवण्यात आली आहे. सध्या काजूचा हंगाम असल्याने शेतकरी दिवसभर बागेत वावरत असतात.  दोन गव्यांची अचानक झुंज लागली होती. परंतु कुत्रे त्यांच्या अंगावर धावत गेल्याने गव्यांनी तेथून धूम ठोकली. मात्र, या गव्यांनी उत्पन्न देणारी नारळाची चार वर्षांची दोन झाडे, दहा सुपारी झाडे, काजूची २५ तर जांभूळ कलम सहा आणि मसाल्यासाठी वापरण्यात येणारे एक दालचिनी झाड यांची मोडतोड केली.बिबट्याकडून कुत्र्याची पिल्ले फस्तदोन दिवसांपूर्वी एका बिबट्याने याच बागेत असणाऱ्या कुत्र्याच्या तीन लहान पिल्लांना पहाटे ४ वाजताच्या सुमारास फस्त केले. कामगार दुंडप्पा कांबळी यांनी विजेरीच्या सहाय्याने बिबट्याला हुसकावून लावले. त्यामुळे येथील नागरिकांच्या जीवास अशा वन्य प्राण्यांमुळे धोका निर्माण झाला आहे. वनविभागाने याकडे लक्ष देऊन मानवी जीवाला धोका निर्माण करणाऱ्या व वस्तीत घुसणाऱ्या प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. 

टॅग्स :forestजंगलsindhudurgसिंधुदुर्ग