शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

होळीचा सण : गवंडीवाड्याच्या शिमगोत्सवाला १२१ वर्षांची परंपरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 14:20 IST

शिमगोत्सवाच्या निमित्ताने शहरातील गवंडीवाडा राममंदिर येथील स्थानिक कलाकारांचे १२१ वर्षांची परंपरा लाभलेले खेळे शहरवासीयांसाठी सध्या लक्षवेधी ठरत आहेत. कोकणात सध्या शिमगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. काही ठिकाणी दीड तर काही ठिकाणी पाच दिवसांचा शिमगोत्सव साजरा केला जातो.

ठळक मुद्देहोळीचा सण : गवंडीवाड्याच्या शिमगोत्सवाला १२१ वर्षांची परंपराशबयची रक्कम उत्सवाच्या कार्यक्रमासाठी वापरतात

मालवण : शिमगोत्सवाच्या निमित्ताने शहरातील गवंडीवाडा राममंदिर येथील स्थानिक कलाकारांचे १२१ वर्षांची परंपरा लाभलेले खेळे शहरवासीयांसाठी सध्या लक्षवेधी ठरत आहेत. कोकणात सध्या शिमगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. काही ठिकाणी दीड तर काही ठिकाणी पाच दिवसांचा शिमगोत्सव साजरा केला जातो.

होळीचा सण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी शहरात धूलिवंदनाचा सण साजरा केला जातो. त्यानंतर शहरात विविध ठिकाणी खेळे सादर केले जातात. शहरातील गवंडीवाडा राममंदिरच्यावतीने स्थानिक कलाकारांमार्फत सादर केल्या जाणाऱ्या खेळ्यांना १२१ वर्षांची परंपरा आहे.होळीच्या तिसऱ्या दिवशीपासून सुरू होणाऱ्या या खेळांमध्ये सचिन पाटकर, ललीत नागडे, गणेश वाडकर, शंकर धुरी, बाळा चुरी, महेश राठोड, विवेक आडकर, संतोष मंडलिक, बंटी हिंदळेकर, अनिकेत गवंडी, उदय बिळवसकर, विकास पांचाळ, हर्षल पेडणेकर, संतोष मंडलिक हे स्थानिक कलाकार रंगून शहरातील देऊळवाडा, भरड, सोमवारपेठ, बाजारपेठ, मेढा तसेच अन्य भागात पहाटेपर्यंत खेळे सादर करून शबय गोळा करतात.यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हे सर्व कलाकार स्वखर्चाने या खेळ्यांमध्ये सहभागी होत आपले योगदान देतात. गोळा होणारे संपूर्ण शबयचे पैसे हे राममंदिरात साजऱ्या होणाऱ्या रामनवमी, हनुमान जयंती उत्सवांच्या कार्यक्रमासाठी वापरले जातात.तीन दिवस सुरू असलेल्या या खेळ्यांचा समारोप शनिवारी करण्यात आला. 

टॅग्स :Holiहोळीsindhudurgसिंधुदुर्ग