शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

मठ गावचा शिमगोत्सव उत्साहात, आठशे वर्षांची ऐतिहासिक परंपरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 15:17 IST

वेंगुर्ले तालुक्यातील मठ गावचा सुमारे आठशे वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेला शिमगोत्सव उत्साहात पार पडला. पारंपरिक घोडेमोडणीच्या कार्यक्रमाने शिमगोत्सवाची सांगता झाली. विविध रंगांच्या उधळणीमुळे अख्खे गाव रंगात न्हावून गेले होते.

ठळक मुद्देमठ गावचा शिमगोत्सव उत्साहातआठशे वर्षांची ऐतिहासिक परंपरा

सिंधुदुर्ग : वेंगुर्ले तालुक्यातील मठ गावचा सुमारे आठशे वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेला शिमगोत्सव उत्साहात पार पडला. पारंपरिक घोडेमोडणीच्या कार्यक्रमाने शिमगोत्सवाची सांगता झाली. विविध रंगांच्या उधळणीमुळे अख्खे गाव रंगात न्हावून गेले होते.मठ येथील होळी उत्सवात पहिल्या दिवशी होळी पौर्णिमा, दुसऱ्या दिवशी हळद लावणे व त्यानंतर गव्हाची रात्र, घोडेमोडणी अशी प्रथा आहे. मुख्य मानकरी आपापली रोंबाटे घेऊन स्वयंभू देवस्थान येथील होळीच्या ठिकाणी येतात. दुपारनंतर प्रत्येक भागातून ही रोंबाटे येतात. यामध्ये तीन भागातून घोडेमोडणी केली जाते. ढोलताशांच्या गजरात घोडेमोडणी मानकरी व ग्रामस्थ घोडेमोडणी करतात. सायंकाळच्या वेळी बनाट्या फिरवण्याची प्रथा आजही जोपासली जात आहे.विविध भागातील रोंबाटे व तीन मानकऱ्यांचे घोडे स्वयंभू मंदिराकडे आल्यानंतर तेथे त्या काळात घडलेल्या युद्धाची आठवण म्हणून लुटपुटीचे युध्द केले जाते. त्यानंतर रितीरिवाजाप्रमाणे धार्मिक कार्यक्रम पार पडल्यानंतर शिमगोत्सवाची सांगता होते. असा हा आठशे वर्षांची परंपरा लाभलेला मठ गावचा शिमगोत्सव यावर्षीही त्याच उत्साहात आणि जोशात साजरा करण्यात आला.घोडेमोडणीला शेकडो वर्षांची परंपरासावंतवाडी संस्थान असताना वेंगुर्ले तालुक्यातील मठ हे गाव या संस्थानचा एक भाग होते. आजही संस्थानिक गाव म्हणून गावाची ओळख आहे. येथील स्वयंभू देवस्थान व मांगल्याचा मठ येथील शिलालेख आजही पहावयास मिळतात. स्वातंत्र्यपूर्व काळात संस्थानाकडून गावातील होळी उत्सवात हळदवणी येत असे. कालांतराने ही प्रथा बंद पडली. त्यावेळी मठ गावात जे युद्ध झाले, त्याची आठवण म्हणून घोडेमोडणीची प्रथा आजही सुरू आहे. 

टॅग्स :Holiहोळीsindhudurgसिंधुदुर्ग