शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

हायकोर्टाने फेटाळला सिव्हिल सर्जन श्रीमंत चव्हाण यांचा अटकपूर्व जामीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 19:40 IST

Court Sindhudurg- महिलेच्या विनयभंगप्रकरणी सिव्हिल सर्जन डॉ. श्रीमंत चव्हाण यांचा अटकपूर्व जामीन आज हायकोर्टाने फेटाळला आहे. जिल्हा न्यायालयात सरकारी वकील रुपेश देसाई यांनी डॉ. चव्हाण यांची पोलीस कोठडी मिळण्यासाठी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून हायकोर्टाने डॉ चव्हाण यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे.

ठळक मुद्दे हायकोर्टाने फेटाळला सिव्हिल सर्जन श्रीमंत चव्हाण यांचा अटकपूर्व जामीनसिव्हिल हॉस्पिटलमधील कर्मचारी महिलेचा विनयभंग

सिंधुदुर्ग : महिलेच्या विनयभंगप्रकरणी सिव्हिल सर्जन डॉ. श्रीमंत चव्हाण यांचा अटकपूर्व जामीन आज हायकोर्टाने फेटाळला आहे. जिल्हा न्यायालयात सरकारी वकील रुपेश देसाई यांनी डॉ. चव्हाण यांची पोलीस कोठडी मिळण्यासाठी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून हायकोर्टाने डॉ चव्हाण यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे.डॉ.चव्हाण यांच्यासमोर आता सुप्रीम कोर्टात जाणे अथवा अटकेला सामोरे जाणे हो दोन पर्याय राहिले आहेत. सिव्हिल हॉस्पिटलमधील कर्मचारी महिलेचा विनयभंग केल्याबद्दल सिव्हिल सर्जन डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी अटकपूर्व जामिन जिल्हा न्यायालयाने फेटाळल्यानंतर हायकोर्टात धाव घेतली होती.

जिल्हा न्यायालयात डॉ चव्हाण यांचा अटकपूर्व जामीन फेटाळून त्यांची पोलीस कोठडी मिळावी यासाठी सरकारी वकील रुपेश देसाई यांनी जोरदार युक्तिवाद केला होता. आरोपी डॉ चव्हाण यांचे व्हाईस रेकॉर्डिंग करणे, डॉ.चव्हाण यांचा मोबाईल जप्त करणे, कर्मचारी महिलेचा विनयभंग केल्याबद्दलचे पुरावे गोळा करणे, कामाची वेळ संपल्यानंतरही पीडित महिलेला डॉ चव्हाण यांच्याकडून मोबाईल कॉल का केले जात होते ? याच्या तपासकामी डॉ श्रीमंत चव्हाण यांची पोलीस कोठडी मंजूर व्हावी यासाठी सरकारी वकील रुपेश देसाई यांनी युक्तिवाद केला होता.अ‍ॅडव्होकेट देसाई यांनी जिल्हा न्यायालयात केलेल्या युक्तिवादाचा संदर्भ ग्राह्य धरत हायकोर्टाने डॉ श्रीमंत चव्हाण यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. नोबेल प्रोफेशन समजल्या जाणाऱ्या डॉक्टरी पेशातील सिव्हिल सर्जन सारख्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याला हायकोर्टाने चुकीच्या कृत्याबद्दल एकप्रकारे दणका दिला आहे.

टॅग्स :Courtन्यायालयsindhudurgसिंधुदुर्गhospitalहॉस्पिटल