शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : हेळदे पूल धोकादायक, प्रवाशांसाठी जीवघेणा प्रवास : दुरुस्ती करण्याची ग्रामस्थांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 15:44 IST

देवगड तालुक्यातील पडेल व तिर्लोट ही दोन गावे जोडणाऱ्या रस्त्यावरील हेळदे पूल ढासळत असून या ठिकाणावरून वाहनचालकांना वाहन चालविणे म्हणजे जीवघेणा प्रवास ठरत आहे. यामुळे या पुलाची तत्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी पडेल परिसरातील ग्रामस्थांनी बांधकाम विभागाकडे केली आहे.

ठळक मुद्देहेळदे पूल धोकादायक, प्रवाशांसाठी जीवघेणा प्रवास दुरुस्ती करण्याची ग्रामस्थांची मागणी

देवगड : तालुक्यातील पडेल व तिर्लोट ही दोन गावे जोडणाऱ्या रस्त्यावरील हेळदे पूल ढासळत असून या ठिकाणावरून वाहनचालकांना वाहन चालविणे म्हणजे जीवघेणा प्रवास ठरत आहे. यामुळे या पुलाची तत्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी पडेल परिसरातील ग्रामस्थांनी बांधकाम विभागाकडे केली आहे.गेले चार दिवस देवगड तालुक्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने अनेक ठिकाणी रस्त्याच्या बाजूचे संरक्षक कठडे खचल्याच्या घटना ताज्या असतानाच तालुक्यातील पडेल व तिर्लोट ही दोन गावे जोडणाऱ्या रस्त्यावरील हेळदे पूल ढासळले असून या पुलावरून वाहतूक करणे धोक्याचे बनले आहे.या पुलाची उंचीही कमी असल्याने मोठा पाऊस पडल्यास पुलावरून होणारी वाहतूक खोळंबते. पुलाची उंची वाढविण्यात यावी अशीही मागणी होत आहे.

तिर्लोट गावातील विद्यार्थ्यांना पडेल हायस्कूलला जाण्यासाठी सुबैया साकव नादुरुस्त असल्याने याच पुलावरून पायी प्रवास करावा लागतो. पडेलवरून तिर्लोटला जाणाऱ्या व तिर्लोटवरून पडेलला येणाऱ्या गाड्यांची वर्दळ या पुलावरून सतत सुरू असते. यामुळे या पुलाची तत्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.ढासळलेल्या या हेळदे पुलाची पाहणी पडेल गावचे स्वाभिमानचे कार्यकर्ते भूषण बोडस, वैभव वारीक, पडेल विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे उपाध्यक्ष संतोष मासये, रवी घाडी व शिवसेनेचे संजय गांवकर, पडेलचे माजी सरपंच संजय मुळम यांनी केली. या पुलाची तत्काळ दुरुस्ती करावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे.या पुलाच्या शेजारी हजारो हेक्टर शेतजमीन असून या पुलावरून पाणी गेल्यानंतर बाजूला असलेल्या शेतमळ्यामध्ये हे पाणी शिरुन शेतजमिनीचेही नुकसान होत आहे. तसेच या पुलाच्या बाजूला खारलँड विभागातर्फे बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यांचीही दुरवस्था झाल्याने शेतजमिनीचे नुकसान होत आहे. 

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभागsindhudurgसिंधुदुर्ग