शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

वैभववाडी तालुक्यात मुसळधार पाऊस : विद्यामंदिर अर्ध्यावर सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 16:24 IST

वैभववाडी तालुक्यात  मुसळधार पाऊस सुरू झाला. पुराचे पाणी सोनाळीतील अभिनव विद्यामंदिरच्या आवारात घुसल्याने शाळा व्यवस्थापनाची तारांबळ उडाली. त्यामुळे अर्ध्यावर शाळा सोडण्यात आली.

ठळक मुद्देवैभववाडी तालुक्यात मुसळधार पाऊस : विद्यामंदिर अर्ध्यावर सोडलेशाळा व्यवस्थापनाची उडाली तारांबळ तिरवडे खिंडीत झाड कोसळून तासभर वाहतूक ठप्प

वैभववाडी : तालुक्यात  मुसळधार पाऊस सुरू झाला. पुराचे पाणी सोनाळीतील अभिनव विद्यामंदिरच्या आवारात घुसल्याने शाळा व्यवस्थापनाची तारांबळ उडाली. त्यामुळे अर्ध्यावर शाळा सोडण्यात आली.तर खारेपाटण-गगनबावडा राज्य महामार्गावर तिरवडे खिंडीत झाड कोसळून तासभर वाहतूक ठप्प झाली होती. करुळ आणि भुईबावडा घाटात किरकोळ दगड पडले; मात्र वाहतूक सुरळीत होती.

सोनाळी येथील अभिनव विद्यामंदिरच्या प्रांगणात पुराचे पाणी आल्यामुळे शाळा व्यवस्थापनाची तारांबळ उडाली.

मुसळधार पावसामुळे तालुक्यातील नद्यानाले दुथडी वाहत आहेत. सकाळी ११ च्या सुमारास पावसाची मोठी सर कोसळल्याने पुराच्या पाण्याचा अभिनव विद्यामंदिरच्या इमारतीला वेढा पडून व्हरांड्यापर्यंत पाणी पोचले होते. त्यामुळे शाळा व्यवस्थापनाची तारांबळ उडाली.पावसाचा जोर वाढू लागल्याने खबरदारी म्हणून अर्ध्यावरुन शाळा सोडून दिली. सोनाळी-कुंभवडे मार्गावरील कॉजवेवर पुराचे पाणी होते. वैभववाडी तालुक्यात पडत असलेल्या संततधार पावसाने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते.ग्रामस्थांनीच रस्त्यावरील झाड हटविलेखारेपाटण-गगनबावडा राज्य महामार्गावर सकाळी ११.३0 च्या सुमारास तिरवडे खिंडीत आकेशियाचे झाड कोसळले. त्यामुळे माग पूर्णपणे बंद होऊन तासभर वाहतूक ठप्प झाली होती. या काळात कुसूर व मांगवली, हेतमार्गे वाहतूक सुरू होती. सार्वजनिक बांधकाम किंवा आपत्कालीन कक्षातून कोणतीही हालचाल न झाल्याने अखेर तिरवडेतील ग्रामस्थांनी रस्त्यावर कोसळलेले झाड हटवून वाहतूक सुरळीत केली.करुळ, भुईबावडा घाटात पडझडकरुळ आणि भुईबावडा घाटात छोटे दगड पडत होते. मात्र, त्याचा वाहतुकीला अडथळा झालेला नाही. दुपारनंतर पावसाचा जोर अंशत: ओसरला. पावसाचा जोर वाढल्याने नदीनाल्यांच्या पातळीत कमालीची वाढ झाली आहे. अतिवृष्टीमुळे तालुक्यात नुकसानीची उशिरापर्यंत नोंद झाली नव्हती.

टॅग्स :monsoon 2018मान्सून 2018sindhudurgसिंधुदुर्ग